पुणे - निर्माल्य संकलन मोहिमेचे उद्‌घाटन करताना शिरीष देशपांडे, मिथिला मांढरे (मध्यभागी), सोबत प्रतापसिंह चव्हाण, समीर रजपूत, संजय शितोळे, सचिन दोरगे आदी.
पुणे - निर्माल्य संकलन मोहिमेचे उद्‌घाटन करताना शिरीष देशपांडे, मिथिला मांढरे (मध्यभागी), सोबत प्रतापसिंह चव्हाण, समीर रजपूत, संजय शितोळे, सचिन दोरगे आदी. 
पुणे

सहा घाटांवर निर्माल्य संकलन

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘सकाळ’ सोशल फाउंडेशन व बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., यांच्या वतीने आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक मर्या. पुणे यांच्या सहकार्याने अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सहा प्रमुख विसर्जन घाटांवर स्वयंसेवकांच्या मदतीने निर्माल्य संकलन मोहीम राबविण्यात आली.

बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., हे या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक होते; तर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक मर्या. पुणे. हे सहप्रायोजक होते. पर्यावरण संवर्धन व नदी प्रदूषण रोखण्यासाठी मुठा नदीवरील सिद्धेश्‍वर- वृद्धेश्‍वर घाट, भिडे पूल, पांचाळेश्‍वर घाट, एस. एम. जोशी पूल (नदीकडील दोन्ही बाजू) आणि पिंपरी येथील पिंपरी वाघिरे या घाटांवर निर्माल्य संकलन करून प्रबोधन करण्यात आले.

या उपक्रमाचे उद्‌घाटन बुलडाणा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे, सीएसआर हेड मिथिला मांढरे, जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पीडीसीसी बॅंकेचे उपसरव्यवस्थापक संजय शितोळे, सहायक सरव्यवस्थापक समीर रजपूत, अभिजित हेगडे, विभाग प्रमुख- नियोजन विकास सचिन दोरगे व कर्मचारी उपस्थित होते. 

या उपक्रमात पुणे महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, विद्यार्थी सहायक समितीचे विद्यार्थी स्वयंसेवक, सकाळ- निर्धार स्वयंसेवक, पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयातील एनएसएसचे विद्यार्थी स्वयंसेवक सहभागी झाले होते. या उपक्रमाला पुणे महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग व पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य पांडुरंग गायकवाड, विद्यासागर वाघिरे, सौरभ कुलकर्णी यांचे विशेष सहकार्य मिळाले. सकाळ सोशल फाउंडेशनचे राहुल गरड यांनी उपक्रमाचे संयोजन केले. दरम्यान,  पुण्यातील सर्व विसर्जन घाटांवर ६५७ टन  निर्माल्य संकलन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीच्या अडचणी वाढल्या, स्टब्सपाठोपाठ अक्षर पटेलही बाद

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT