पुणे

‘फुलराणी’ची धमाल सफर (व्हिडिओ)

नीला शर्मा

पुणे - ती ‘फुलराणी’ रुळांवरून धावत होती... मध्येच राक्षसाचं तोंड असलेला बोगदा आला... तिच्यात बसून प्रवास करणाऱ्या बच्चे कंपनीने जोरदार आरोळ्या ठोकल्या अन्‌ बोगदा संपताच सगळी मुलं आणि पालकमंडळी खुदकन हसली... 

पेशवे उद्यानात खास मुलांसाठी असलेली, पण मोठ्या माणसांनाही भुरळ पाडणारी ती ‘फुलराणी’! तिचं स्टेशन सध्या मुलं आणि पालकांच्या गर्दीनं गजबजलेलं असतं. उन्हाळ्याच्या सुटीत पुण्यातले आणि बाहेरगावाहून आलेले चिमुकले प्रवासी या ‘फुलराणी’ची सफर करायला उत्सुक असतात. मुलं स्टेशनवरच्या तिकीट खिडकीतून तिकीट घेतात. फलाटावर उभे राहून झुकझुक गाडी कधी येईल याची वाट बघतात. ती लांबून येताना दिसते.  घंटेच्या आवाजाने छोटे प्रवासी सावध होतात आणि ‘फुलराणी’ येऊन थांबताच लगबगीने आत शिरतात. पुन्हा घंटानाद होतो. फुलराणीचा चालवणारे काका हॉर्न वाजवतात आणि पुढे ही गाडी डौलात निघते. 

तीन डब्यांच्या या चिमुकल्या फुलराणीचा जेमतेम तीनशे तीस मीटरचा प्रवास अवघ्या पाच मिनिटांचा; पण त्यामुळे होणारा आनंद मात्र वर्षांनुवर्षे पुरणारा. तिच्यातून फेरी मारताना जणू स्वप्नातल्या गावाला जात असल्याची भावना मुलांची आणि त्यांच्या पालकांचीही असते. 

याबाबत उद्यान अधिकारी विलास पाठक म्हणाले, ‘‘१९५६मध्ये सुरू झालेली आणि पेशवे उद्यानाची शान असलेली ही ‘फुलराणी’ अलीकडेच ६३ वर्षांची झाली. या लाडक्‍या ‘फुलराणी’चा वाढदिवस नुकताच दिमाखात साजरा करण्यात आला. या झुकझुक गाडीतून अनेक कुटुंबांतील दोन ते तीन पिढ्यांनी प्रवास केला आहे. मागची पिढी आपल्या बालपणीच्या आठवणी जागवत पुढच्या पिढीला या प्रवासाचा अनुभव देण्यासाठी हळवेपणाने घेऊन येते. पुढच्या पिढीनं या सफरीची मौज लुटली की, मागच्या पिढीला आगळंवेगळं समाधान वाटतं.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT