सकाळ
सकाळ Sakal
पुणे

दहावी, बारावी विद्यार्थ्यांसाठी ‘सकाळ’तर्फे मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा

पुणे - दहावी, बारावी म्हणजे आयुष्यातील महत्त्वाचं एक वळणं. या टप्प्यावरून पुढे जाताना भविष्याचं नियोजन करण्याची संधी मिळते. त्यानुसार करिअरला दिशाही देता येते. त्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळालं की मग काय?. ‘स्काय इज द लिमिट!’ त्यातून भविष्याला सोन्याची झळाळी देता येते. म्हणून या टप्प्यावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सकाळ पुढाकार घेत आहेत. दहावी, बारावीनंतर शिक्षणाच्या वेगवेगळ्या संधी कोणत्या आहेत, याचे तपशीलवार मार्गदर्शन ‘सकाळ’ करणार आहे. एक जून ते ३० जून या महिनाभराच्या काळात तुम्हाला शिक्षणाच्या विविध शाखांची माहिती मिळेल.

कला, वाणिज्य आणि विज्ञान असे पारंपरिक शिक्षण असो नव्या युगातील तंत्रज्ञानाने खुली केलेली शिक्षणाची नवी दालने असतो, त्या प्रत्येक शाखेची माहिती, संबंधित अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना आवश्‍यक परीक्षांची माहिती, त्याची प्रक्रिया यांसारखी माहिती तुम्हाला या सदरातून मिळेल. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, संस्थाचालक यांचे अनुभव देखील तुम्हाला यातून तुमच्या संग्रही ठेवता येणार आहेत. याशिवाय एखादा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर निर्माण होणाऱ्या स्वयंरोजगार आणि रोजगाराच्या संधी देखील तुम्हाला समजतील. वेगवेगळ्या शाखांचे अभ्यासक्रम पूर्ण करून स्वत: हिमतीवर यशस्वी झालेल्या तरुणांचे अनुभवकथनही यात वाचायला मिळेल.

कला शाखा निवडावी की वाणिज्य?...अभियांत्रिकीकडे जावे की वकिली करावी, यांसारखे अनेक प्रश्‍न या टप्प्यावर विद्यार्थ्यांबरोबरच पालकांसमोरही असताना. म्हणूनच करिअरची वाट निवडताना पालकांचा आणि विद्यार्थ्यांना गोंधळ होऊ नये, त्यांना निर्णय घेणे तुम्हाला सोपे जावे, या हेतूने सकाळ माध्यम समूह हा उपक्रम राबविणार आहे. शिक्षणाची शाखा निवडताना अनेकदा आपला कल देखील आपल्याला समजत नाही. त्यासाठी यासंबंधी काही महत्त्वाच्या टिप्स या सदराच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीच्या अडचणी वाढल्या, स्टब्सपाठोपाठ अक्षर पटेलही बाद

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT