चास, ता. १६ ः वाडा (ता. खेड) येथील श्री गडदुदेवी देवी मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता सागर महाराज शिर्के यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.
सप्ताहात काकड आरती, नेमाचे भजन, हरिपाठ व नामवंत कीर्तनकारांची कीर्तनरूपी सेवा पार पडली. यामध्ये संतोषीताई जठार, श्रावण महाराज सुपे, ज्ञानेश्र्वर महाराज दौंडकर, मंगलताई लांडगे, समाधान महाराज कापरे, बाळशिराम महाराज मिंडे, राजेंद्र महाराज सदगिर यांची कीर्तन सेवा झाली.
काल्याचा महाप्रसाद अक्षय केदारी व चिमाजी सुरकुले यांच्यावतीने देण्यात आला. तर अमर सांडभोर, स्वप्नील कहाणे, गौरव क्षीरसागर यांच्यावतीने पाण्याची व्यवस्था करण्यात आली. काल्याच्या कीर्तनासाठी जिल्हा परिषद सदस्य समीर सुपे, जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे, पंचायत समिती सदस्या मनिषा हिले आदी उपस्थित होते.
या सप्ताहाचे नियोजन संस्थापक अध्यक्ष काळुराम सुपे, अध्यक्ष गजानन सुरकुले, सचिव किशोर सुपे, निवृत्त आयुक्त तुकाराम सुपे, बाळशिराम सुपे आदींसह सप्ताह समिती यांनी केले होते. सूत्रसंचालन मच्छिंद्र जगदाळे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.