Housing-Federation
Housing-Federation 
पुणे

हाउसिंग फेडरेशनने पुकारला एल्गार

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - पिंपरी चिंचवड हाउसिंग फेडरेशनच्या वतीने राजकीय नेत्यांना सोबत घेऊन शहरातील सोसायटीधारकांचे प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यात यश आले नाही. त्यामुळे फेडरेशनने राजकीय नेत्यांना न बोलाविता महामेळावा घेण्याचे निश्‍चित केले आहे. या मेळाव्याला मंत्री आणि शासकीय अधिकाऱ्यांना निमंत्रित केले जाणार आहे.

शहरात तीन हजार ८६९ नोंदणीकृत सोसायटी आहेत. त्यामध्ये जवळपास दीड लाख फ्लॅटधारक राहतात. ७५ किंवा त्यापेक्षा अधिक फ्लॅटधारक असलेल्या सोसायट्यांनी कचऱ्याची विल्हेवाट स्वतःच लावावी, अशी नोटीस महापालिकेने १८० सोसायट्यांना पाठविली आहे. कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यास महापालिका संबंधित सोसायटीमधील प्रत्येक फ्लॅटधारकाकडून ६० रुपये शुल्क आकारणार आहे. मात्र, बैठ्या घरांच्या मालकाकडून ३० रुपये शुल्क महापालिका आकारणार आहे. नियम सर्वांनाच समान असणे गरजेचे असल्याचे फेडरेशनचे म्हणणे आहे. मात्र, या अन्यायकारक नोटिशीबाबत शहरातील एकाही नगरसेवकाने प्रशासनाला जाब विचारलेला नाही. 

विविध भागांत अमृत योजनेतून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, ही जलवाहिनी झोपडपट्टीजवळून टाकली आहे. या जलवाहिनीतून अनेकांनी अनधिकृत नळजोड घेतले आहेत. या नळजोडास मोटार लावून पाणी खेचले जाते. दुसरीकडे सोसायट्यांना अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने त्यांना पाण्याचे टॅंकर मागवावे लागत आहेत. यामुळे सोसायट्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

ही वस्तुस्थिती नगरसेवकांना माहीत असूनही त्यांच्याकडून सोसायटीधारकांच्या प्रश्‍नाची सोडवणूक होताना दिसत नाही. काही समस्या सहकार खात्याशी संबंधित आहेत. या प्रश्‍नांबाबत नगरसेवकांना कल्पना नाही. त्यामुळे या समस्या मांडण्यासाठी सहकारमंत्र्यांना महामेळाव्याला निमंत्रित केले जाणार आहे. सध्या कायदेशीर मार्गाने आम्ही लढा सुरू केला आहे. त्यातूनही समस्या न सुटल्यास रस्त्यावर उतरून लढा देऊ, अशी मानसिकता फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्‍त केली.

केवळ बोटावर मोजण्याइतकेच नगरसेवक सोसायटीधारकांच्या प्रश्‍नाकडे गांभीर्याने पाहतात. हे प्रश्‍न सोडविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. नगरसेवकांना महापालिकेच्या कामाचा अनुभव असला तरी सहकार खात्याच्या कामाचा अनुभव नाही. यामुळे सहकारमंत्र्यांना महामेळाव्याला बोलाविल्यास संबंधित प्रश्‍न मार्गी लागतील. लवकरच या महामेळाव्याची तारीख निश्‍चित केली जाईल.
- सुदेश राजे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड हाउसिंग फेडरेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT