Court
Court 
पुणे

मला खोट्या केसमध्ये गुंतविले - ॲड. गडलिंग

सकाळवृत्तसेवा

पुणे - दलित, आदिवासींसाठी मी लढत असलेली न्यायाची लढाई दडपवण्याचा सरकार प्रयत्न करत आहे, म्हणूनच मला खोट्या केसमध्ये गुंतवून तुरुंगात टाकले, असा आरोप ॲड. सुरेंद्र गडलिंग यांनी स्वत:च्या जामीन अर्जावर युक्तिवाद करताना केला. एल्गार परिषदेचा माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून न्यायालयीन कोठडीत असलेल्या ॲड. गडलिंग यांच्यासह सुधीर ढवळे, प्रा. शोमा सेन, रोना विल्सन, महेश राऊत या पाचही आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.

सत्र न्यायाधीश के. डी. वडणे यांच्यासमोर ॲड. गडलिंग यांच्या जामीन अर्जावर बचाव पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाला. ॲड. गडलिंग यांनी युक्तिवाद करताना तपासयंत्रणांच्या कार्यपद्धतीवर अनेक आरोप केले. भीमा कोरेगाव हिंसाचार व एल्गार परिषदेचा काही संबंध नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले, तरी तपासयंत्रणा आमचा संबंध हिंसाचाराशी का जोडते? यासह अनेक प्रश्‍न त्यांनी युक्तिवादादरम्यान विचारले.   पोलिसांनी याप्रकरणी घेतलेल्या पत्रकार परिषदा, त्याबाबत उच्च न्यायालयाने पोलिसांवर ओढलेले ताशेरे इ. बाबी मांडत असताना सर्वोच्च न्यायालयातील रोमिला थापर यांच्या रिट याचिकेवर न्या. चंद्रचूड यांनी दिलेले ताशेरेही ॲड. गडलिंग यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. १२ ऑक्‍टोबरला सरकारी वकील उज्ज्वला पवार या जामीन अर्जावर युक्तिवाद करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Paneer Stuffed Chilla: विकेंडला बनवा पनीर स्टफ चिला, नोट करा रेसिपी

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

SCROLL FOR NEXT