इफ्तार पार्टीतून जपला सामाजिक सलोखा
उंडाळ्यात विविध गणेश मंडळांसह ग्रामस्थांच्या वतीने उपक्रम
उंडाळे, ता. १४ ः येथील ग्रामस्थ व विविध गणेश मंडळे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. यातूनच पवित्र रमजान महिन्याचे आणि शुक्रवार (जुम्मा) चे औचित्य साधून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या इफ्तार पार्टीत हिंदू- मुस्लिम बांधव सहकुटुंब सहभागी झाले. यातून सामाजिक सलोखा दिसून आला.
येथील ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ व ज्योतिर्लिंग गणेश मंडळ, हनुमान गणेश मंडळ, नवयुवक गणेश मंडळातील कार्यकर्त्यांनी या इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या वेळी शिक्षक शंकर आंबवडे व शब्बीर मुल्ला यांनी मनोगत व्यक्त करत एकात्मतेचा संदेश दिला गेला.
ज्येष्ठांच्या व गणेश मंडळातील कार्यकर्त्यांच्या संकल्पनेतून इफ्तार पार्टीचे नियोजन केल्याबद्दल ज्येष्ठ मंडळी शामराव पाटील, पंडित पाटील, जे. डी. पाटील, चंद्रकांत पाटील, दिलीप पाटील, प्रमोद पाटील, गणेश पाटील, तानाजी माने, शंकर आंबवडे, विजय पाटील, संजय पाटील, ॲड. दत्तात्रय पाटील, जगन्नाथ पाटील, विक्रम पाटील, राजेंद्र दिंडे, अजित पाटील, श्रीकांत पाटील, सतपाल पाटील, आनंदराव पाटील, भीमराव पाटील व मंडळातील कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी रहिमान नायकवडी, रज्जाक नायकवडी, नजीर नायकवडी, शब्बीर नायकवडी, हाजी अयुब नायकवडी, सादीज नदाफ, मुबारक मुल्ला, जहाँगीर संदे, ताजुद्दीन नायकवडी, वजीर नायकवडी, आलम नायकवडी, अजहर नायकवडी, जहाँगीर नायकवडी, अस्लम मुल्ला, सिकंदर नायकवडी, मैनुद्दीन नायकवडी, तसेच हिंदू- मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. दिलीप पाटील यांनी आभार मानले.
------------------------
00840
उंडाळे : येथील इफ्तार पार्टीत सहभागी हिंदू- मुस्लिम बांधव.
------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.