pistul
pistul 
पुणे

रणधुमाळीत बुलेटराजांवर बडगा

पांडुरंग सरोदे

दोन महिन्यांत २३ जणांना अटक; २५ बेकायदा पिस्तुले जप्त
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरामध्ये बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांचे काही महिन्यांपासून फासे आवळण्यास सुरवात केली आहे. गेल्या दोन महिन्यात २३ जणांना अटक करून त्यांच्याकडून २५ पिस्तुले जप्त केली आहेत. आगामी काळात येणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन पोलिसांनी ‘बुलेट राजां’वर कारवाईला गती देण्यावर भर दिला आहे.

गुन्हेगारी कारवायांपासून हौसेसाठी, वचक निर्माण करण्यासाठी पिस्तूल बाळगण्याचे आकर्षण वाढले आहे. महाराष्ट्रजवळील काही राज्यांमध्ये बेकायदा शस्त्रनिर्मितीच्या ठिकाणी पाच-दहा हजार रुपयांना पिस्तूल विकत घेतले जाते. दलालांमार्फत २५ ते ३० हजार रुपयांमध्ये त्यांची विक्री केली जात आहे. त्यासाठी अनेकदा ऑनलाइन व्यवहाराचा उपयोग केला जातो. अशांवर सातत्याने कारवाई केली जाते. त्यामुळे त्यांच्यावर काही प्रमाणात वचक बसला आहे. मात्र, निवडणुकांमुळे बेकायदा पिस्तुलांच्या खरेदी-विक्रीचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता आहे. त्यादृष्टीने पोलिसांकडे जानेवारी ते फेब्रुवारी २०१९ मध्ये बेकायदा पिस्तूल बाळगल्याची १४  प्रकरणे दाखल झाली आहेत.

‘सीआयडी’ला देणार माहिती  
मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थानमधून पिस्तूल, गावठी कट्टे अन्‌ शस्त्र तस्करांकडून पुण्यात आणले जातात. मध्य प्रदेशात दावलबेडी, उंडीखोदर, सिरवेल, सिंगनू, अंबा, नवलपुरा, सीतापुरा या भागांमध्ये शस्त्र बनविली जातात. काही वर्षांपासून धुळे, जळगाव येथील सीमाभागातूनही पिस्तूल आणले जात होते. पोलिसांकडील ही माहिती ‘सीआयडी’कडे देणार  असल्याचे पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी वार्षिक गुन्हे विश्‍लेषण पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. 

पाच वर्षांत ७२५ जण गजाआड
बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी पाच वर्षांमध्ये ५५० गुन्हे दाखल केले असून त्यामध्ये ७२५ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून ७०० पिस्तूल आणि १६०० काडतुसे जप्त केली आहेत. या आकडेवारीवरूनच शहरात बेकायदा पिस्तूल खरेदी-विक्री करणारे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे दिसते.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर दोन महिन्यांपुर्वीपासून बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. शस्त्र विकत घेणाऱ्यांपासून त्याची विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना अटक केली जाईल.
- शिरीष सरदेशपांडे, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident: कोल्हापुरातील रस्त्यावर घडला 'कॅरम बोर्ड'सारखा थरार! भरधाव कारनं दुचाकींना उडवलं, तिघांचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

Market Cap: सेन्सेक्स ऐतिहासिक उच्चांकावर; बीएसई कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 14 लाख कोटींची भर

Wayanad Lok Sabha Election Results: काँग्रेससाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या वायनाडमध्ये राहुल गांधींना धक्का?

"BJP ने आपल्याच समर्थकांना हिंसक बनवले," माजी मुख्यमंत्र्याच्या धक्कादायक आरोपांमुळे देशभरात खळबळ

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याबद्दल नागपूरच्या निशांत अग्रवालला जन्मठेपेची शिक्षा

SCROLL FOR NEXT