Indapur gets water from Khadakvasala
Indapur gets water from Khadakvasala 
पुणे

इंदापूरला मिळणार खडकवासलाचे पाणी

सकाळवृत्तसेवा

कळस - खडकवासला कालव्यातून इंदापूर तालुक्याला शेती सिंचनासाठी उद्या (मंगळवारी, ता. 18) दुपारपासून आवर्तन सोडण्यात येणार आहे. याचा फायदा तालुक्यातील जवळपास 15 ते 20 हजार हेक्टर क्षेत्रावरील उभ्या पिकांना होणार असल्याची माहिती आमदार दत्तात्रेय भरणे यांनी दिली.

इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनाचे आवर्तन जलसंपदा विभागाने अचानक बंद केल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. आज पुण्यातील सिंचन भवन येथे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आमदार भरणे यांनी शेकडो शेतकऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ता. ना. मुंडे, अधिक्षक अभियंता संजीव चोपडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, जेष्ठ नेते अशोक घोगरे, साहेबराव चोपडे, तुकाराम बंडगर, प्रकाश ढवळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत प्रतापराव पाटील यांनी इंदापूर तालुक्याला खडकवासला कालव्यातून पाणी देण्यास जलसंपदा विभाग नियमावर बोट ठेवत आहे. मात्र हा नियम पिण्याच्या पाण्याविषयी आणि शुध्दीकरणातून जुना मुठा कालव्यात सोडावयाच्या पाण्याविषयी का दाखविला जात नाही असा सवाल उपस्थित केला. याचबरोबर तालुक्यातील शेतीला पाणी मिळालेच पाहिजे अशी आग्रही भूमिका शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतली.

महारुद्र पाटील यांनी निरा डावा कालव्याला पाणी देण्याविषयीचा मुद्दा मांडला. 
यावेळी आमदार भरणे यांनी इंदापूरच्या सिंचनाचे पाणी अचानकपणे बंद केल्यामुळे अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तालुक्यात पाऊस नसल्याने जवळपास 15 ते 20 हजार हेक्टरवरील पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे इंदापूर तालुक्यातील पिकांना पाणी तत्काळ सोडण्याच्या व जास्तीत जास्त क्युसेक वेगाने पाणी देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यावर मुख्य अभियंता व अधिक्षक अभियंता यांनी उद्या मंगळवार (ता. 18) दुपारपासून इंदापुरातील शेती सिंचनासाठी पाणी सोडले जाईल. तसेच ते जास्तीत जास्त क्युसेकने उभ्या पिकांना देण्याचे येईल. निरा डाव्या कालव्यावरील 59 क्रमांकाच्या वितरिकेला सध्या पाणी सुरू आहे ते झाल्यानंतर सर्व वितरिकांना पाणी देण्याचे नियोजन असल्याचे उपस्थितांना सांगितले.

इंदापूर तालुक्याला जलसंपदा विभाग 10 ते 12 दिवस पाणी सोडले आहे, असे सांगत आहे. मात्र हे चूकीचे असून या उत्तराबद्दल अधिकाऱ्यांना भरणे यांनी चांगलेच सुनावले. यापुढील काळात आपण तालुक्याला सोडण्यात आलेलेल पाणी किती क्युसेकने व किती प्रमाणात दिले याचा आढावा प्रत्येक आवर्तनाच्या वेळी आपण घेणार असल्याचे स्पष्ट केले. यामुळे अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त क्युसीएस वेगाने इंदापूरच्या हक्काचे पाणी सर्व आवर्तनांच्या काळात कालव्यात सोडावे अशी सूचनाही आमदार भरणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

सभापती प्रवीण माने यांनी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना पाणी मिळाले नाही तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी व हक्काच्या पाण्यासाठी जलसंपदा विभागाच्या विरोधात सोनाई परिवाराच्या माध्यमातून वकील देवून याचिका दाखल करणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले. यामुळे अधिकाऱ्यांना खडकवासल्यातून इंदापूरला जास्तीत जास्त पाणी देण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT