kalmodi 
पुणे

हुश्श, पुण्यातील हे धरण लवकरच भरणार 

राजेंद्र लोथे

चास (पुणे) : खेड तालुक्‍यासह आंबेगाव तालुक्‍याच्या सातगाव पठार भागाला वरदान ठरणाऱ्या खेड तालुक्यातील कळमोडी  धरणात 86.54 (1.31 टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. धरण भरण्याच्या मार्गावर आहे. 

खेड तालुक्‍यात पावसाने जेमतेम हजेरी लावली असल्याने कळमोडी धरण भरण्याच्या मार्गावर असल्याने हाच काय तो दिलासा आहे. हे धरण भरल्यावर यातून विसर्ग होणारे पाणी चासकमान धरणात येते. त्यामुळे चासकमान धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार असल्याची माहिती धरणाचे शाखा अभियंता उत्तम राऊत यांनी दिली आहे. 

खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यात आरळा नदीवर असलेले कळमोडी धरण हे 1.54 टीएमसी क्षमतेचे आहे. खेड तालुक्‍यातील चासकमान धरणाच्या पाण्यापासून वंचित राहिलेले क्षेत्र व आंबेगाव तालुक्‍यातील सातगाव पठार भागासाठी वरदान ठरणारे हे धरण आहे. धरण कायम जुलै महिन्यातच ओव्हरफ्लो होते. मात्र, चालू वर्षी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील भोमाळे, परसूल, घोटवडी, कुडे या परिसरात पावसाचा जोर जेमतेम राहिले. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात कासवगतीने वाढ होते आहे. तरीही पावसाचा जोर असाच राहिल्यास दोन दिवसांत धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्‍यता आहे. 

कळमोडी धरण भरल्यावर या धरणातून बाहेर पडणारे पाणी चासकमान धरणात येते. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे. धरणस्थळावर रोहिदास नाईकडे, सुदाम सावंत, बाबाजी शिंदे, संभाजी बोंबले, बाळासाहेब नाईकडे हे कर्मचारी पाण्याच्या साठ्यावर चोवीस तास लक्ष ठेवून आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kisan Veer Sugar Factory: किसनवीर साखर कारखान्यात कामगारांचा उद्रेक, अनेक वर्षांपासून पगार नाही; मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील विरोधात संताप

IND vs WI 1st T20: आज पहिला टी-२०, पण गंभीरांसमोर मोठा पेच! वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन? अर्शदीपच्या कमबॅकसह अशी असेल भारताची Playing XI

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Marathi News Live Updates: ४५ हजार शेतकऱ्यांचे केळी पीक विमा अर्ज नामंजूर; विमा कंपनीच्या कारभारावर गंभीर आरोप

Supreme Court: फॉर्म ६ला मान्यता दिलीच नाही, सुप्रीम कोर्टाची SIR प्रकरणी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगाला नोटीस

SCROLL FOR NEXT