खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्यात 'एवढ्या' टक्क्यांनी वाढ

अनिल सावळे
Monday, 10 August 2020

खडकवासला प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमध्ये गतवर्षी 10 ऑगस्टपर्यंत 100 टक्के पाणीसाठा झाला होता. चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरली होती. परंतु यावर्षी आजअखेर पाणीसाठा 18.01 टीएमसीपर्यंत पोचला आहे.
 
पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा वाढत असून, तो आता सोमवारी सकाळपर्यंत 18.01 अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजे 61.77 टक्के इतका झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खडकवासला प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमध्ये गतवर्षी 10 ऑगस्टपर्यंत 100 टक्के पाणीसाठा झाला होता. चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरली होती. परंतु यावर्षी आजअखेर पाणीसाठा 18.01 टीएमसीपर्यंत पोचला आहे.

कोरोनाग्रस्तांसाठी बनवलेल्या रुग्णालयाला आग; ०७ जणांचा मृत्यू

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा टीएमसीमध्ये  (कंसात टक्केवारी) : 
टेमघर 1.57    (1.57)
वरसगाव 7.25    (56.51)
पानशेत 7.32    (68.75)
खडकवासला 1.87    (94.80)

तहसीलदार महिलेच्या पतीकडून जीवाला धोका असल्याची 'या' राष्ट्रवादीच्या आमदारांनी केली तक्रार 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pune 18 TMC Water storage at Khadakwasla project