Bus Accident Sakal
पुणे

कात्रज घाटात बस पलटी

कर्नाटक पासिंगच्या बसचा अपघात; चालकासह चार जखमी

सकाळ वृत्तसेवा

कात्रज : पुणे-सातारा महामार्गावर (Pune Satara Road) जुन्या कात्रज घाटातील भिलारेवाडी येथील एका तीव्र वळणावर बस पलटी (Bus Accident) झाल्याची घटना घडली. पहाटेच्या सुमारास १९ प्रवाशांना घेऊन जाणारी कर्नाटक पासिंगची बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. यामध्ये चालकासह चार जण जखमी झाले. (Katraj Ghat Bus Accident)

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक राज्यातील हुबळी-शिर्डी (बस क्रमांक केए २५ एफ ३२४८) ही मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास भिलारेवाडी येथील के-७२ हॉटेल शेजारी असलेल्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस तीस फूट खाली खड्ड्यात कोसळली. या अपघातात बसची पलटी होऊन मोठे नुकसान झाले.

चालकासह चार प्रवाशी जखमी झाले. त्यानंतर स्थानिक नागरिक, भारती विद्यापीठ पोलिसांच्या मदतीने पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गोडसे व कर्मचारी यांनी खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच कात्रज अग्निशामक दलाने मदतकार्य करत प्रवाशांना बाहेर काढले. पुढील तपास भारती विद्यपीठ पोलीस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Trophy: पृथ्वी शॉ झाला महाराष्ट्राचा कर्णधार! ऋतुराज गायकवाडला संघात स्थान का नाही? पाहा संपूर्ण टीम

Satara Girl Death : सेकंदाच्या रागात उद्ध्वस्त झालं कुटुंब! साताऱ्यात शिक्षक बापानं 17 वर्षाच्या पोरीला क्रिकेटच्या बॅटनं संपवलं; मृत्यूनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

पुण्यातील 'या' ठिकाणी झालेलं माहेरची साडी सिनेमाचं शुटिंग, सिनेमातील घर आठवतय का? अजूनही गाजलेलं शूटिंग लोकेशन!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर पदवीधरमधून सतीश चव्हाण यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर

Kalika Mata Tradition: माते, काही चूक झाली असेल तर माफ कर’; येरोळमध्ये कालिका मातेला गावात आणण्यासाठी अनोखी परंपरा, नेमकी काय आहे परंपरा?

SCROLL FOR NEXT