Psychotic person
Psychotic person sakal
पुणे

Kirkitwadi News : ऊन किती लागतंय, एवढे लोकं बसलेत, सावली नको का? मनोरूग्णाने कृतीतून दिला वृक्षसंवर्धनाचा धडा

निलेश बोरुडे

'ऊन किती लागतंय, एवढे लोकं बसलेत सावली नको का.....?' असे स्वतःशीच बडबडत त्या मनोरुग्णाने अगोदर काहीतरी शोधत स्मशानभूमीत वेढा घातला.

किरकटवाडी - सिंहगड रस्त्याला लागून असलेल्या किरकटवाडी फाट्याजवळील स्मशानभूमीत दशक्रिया विधी सुरू होता. महाराजांचे प्रवचन सुरू होते. समोर शेकडो महिला व पुरुष बसलेले होते आणि महाराज ज्ञानेश्वरीतील ओवीचे विवेचन करत कसे विचार असावेत,कसे वागावे व कसे जगावे असे सांगत असताना अचानक एक मनोरुग्ण तेथे आला. अतिशय उच्च विचार सांगणाऱ्या महाराजांना आणि समोर बसून ऐकणाऱ्या सर्व उपस्थित महिला-पुरुषांना त्या मनोरुग्णाच्या एका कृतीने क्षणक्षर अंतर्मुख होऊन विचार करण्यास भाग पाडले !

'ऊन किती लागतंय, एवढे लोकं बसलेत सावली नको का.....?' असे स्वतःशीच बडबडत त्या मनोरुग्णाने अगोदर काहीतरी शोधत स्मशानभूमीत वेढा घातला. मनोरुग्ण आहे म्हणून कोणीही काही न बोलता त्याच्याकडे पाहत होते. अगदी महाराजही थोडावेळ प्रवचन थांबवून तो काय बोलतोय?काय करतोय ते पाहत होते.

अखेर दुसऱ्या फेरीच्या वेळी तो मनोरुग्ण जे शोधत होता ती वस्तू त्याला सापडली. स्मशानभूमीत नागरिकांच्या सोयीसाठी बांधलेल्या खोलीत ठेवलेली पाच लीटरची मोकळी प्लास्टिकची पाण्याची बाटली घेऊन तो बाहेर आला. बाहेरच्या नळाला पाणी येत नव्हते म्हणून तो स्मशानभूमीच्या शेजारी असलेल्या इमारतीकडे गेला आणि पाणी भरुन घेऊन आला. जेथे बसून महाराज प्रवचन करत होते त्या ओट्याच्या दोन्ही बाजूंना तीन झाडे लावण्यात आलेली आहेत त्या झाडांना मनोरुग्णाने पाणी घातले आणि त्यानंतर तो मनोरुग्णही प्रवचन ऐकायला बसला. "ऊन किती लागतंय, सावली नको का?" या त्या 'मनोरुग्णा'च्या शब्दांचा अर्थ 'महाराजां'सह इतर सर्व 'शहाण्या' नागरिकांच्या दुर्दैवाने मनोरुग्ण झालेल्याच्या एका कृतीने लक्षात आला. झाडं जगवणं किती आवश्यक आहे हे एका मनोरुग्णाने आपल्या कृतीतून सुशिक्षित समाजाला दाखवून दिलं!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

ICMR On Side Effects Of Covaxin: Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट; ICMR ने अहवालावर उपस्थित प्रश्न केले

SCROLL FOR NEXT