हडपसर - परंपरागत कला सादर करीत दान मागत असताना वासुदेव.
हडपसर - परंपरागत कला सादर करीत दान मागत असताना वासुदेव. 
पुणे

काळाच्या ओघात वासुदेव लोककलेला अखेरची घरघर 

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘अवो शंकराच्या नावानी, अवो पांडुरंगाच्या नावानी, सकाळच्या रामपाऱ्यामंदी, वासुदेवाचं लेकरू आलं, धर्म पावला, दान पावलं’ असे म्हणत बासरी आणि टाळ वाजवत भल्या पहाटे नाचत येणारा वासुदेव आता दिसेनासा झाला आहे. ‘दात्याला दान पावलं’ म्हणणारी वासुदेवाची गाणी अखेरच्या घटका मोजत आहेत.

जुन्या काळात मराठी मुलखातील खेडोपाड्यातील पहाट मोठी देखणी असायची. घराघरांतून जात्यावरची गाणी म्हणत धान्य दळणाऱ्या महिला, गल्लीगल्लीत खांद्यावर कावड घेऊन आडावरून पाणी आणणारी गडीमाणसे अन्‌ त्याच वेळी डोक्‍यावर मोरपिसांची उभट टोपी घातलेला, अंगात विशिष्ट प्रकारचा झगा, पायात घुंगरू, हातात टाळ आणि बासरी घेऊन गाणे म्हणत नाच करणारा वासुदेव दिसायचा.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अंगणात वासुदेव आला म्हणजे भाग्याची गोष्ट मानली जात असे. कारण त्या रूपाने श्रीकृष्ण घरी आल्याचा आनंद होत असे. त्याचे दर्शन घडले की लहान मुले आनंदून जात. महिला मंडळी सुपातून जोंधळे घालत आणि दान करीत. पुरुष माणसे पैसा देऊन त्याला नमस्कार करीत. वासुदेवही ‘दान पावलं’ म्हणत अंगणात नाच करी. सारे अंगण जसे काही समाधानाने आनंदून जाई.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात वासुदेव हा समाजप्रबोधन करणारा समाज म्हणून ओळखला जात होता, पण सध्या या समाजाची दशा झालेली असून या झालेल्या दशेला चांगली दिशा मिळावी यासाठी वासुदेव समाजाकडे सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचे समाजबांधवांची मागणी आहे.

आमचा समाज हा महाराष्ट्रातील गावागावांमध्ये सकाळच्या प्रहरी घरोघरी फिरून पाडुरंगावरील अभंग, गवळणी गात दान मागणारा लोककलावंत म्हणून परिचित आहे. काळाच्या ओघात वासुदेव या लोककलेची दयनीय अवस्था झालेली असून, या लोककलाकारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. शिक्षण व्यवस्थेत नगण्य संख्या आहे. त्यामुळे आमच्या समाजातील बेरोजगार युवकांची संख्यासुद्धा जास्त असल्याने शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. 
- संतोष गोरे, वासुदेव कलावंत

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT