सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - विद्यापीठाच्या 115 व्या पदवीप्रदान सोहळ्यात वसुंधरा कुचंकर या विद्यार्थिंनीला सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. अशोक चव्हाण, कुचंकर, डॉ. बैरत्रॉं द हार्टिंग, डॉ. नितीन करमळकर, डॉ. प्रफुल्ल पवार उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - विद्यापीठाच्या 115 व्या पदवीप्रदान सोहळ्यात वसुंधरा कुचंकर या विद्यार्थिंनीला सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. अशोक चव्हाण, कुचंकर, डॉ. बैरत्रॉं द हार्टिंग, डॉ. नितीन करमळकर, डॉ. प्रफुल्ल पवार उपस्थित होते. 
पुणे

इंग्रजीऐवजी अन्य भाषा शिका - डॉ. हार्टिंग

सकाळ वृत्तसेवा

पुणे - 'जगात सर्वांनाच इंग्रजी कळते, या भ्रमात राहून केवळ एकच भाषा शिकण्यात अडकून पडू नका. आपण आपल्यापरीने इंग्रजी जाणत असतो, त्यामुळे स्पॅनिश, रशियन, फ्रेंच अशा वेगवेगळ्या भाषा शिका. त्याद्वारे स्वत:ला जगातील इतर लोकांशी जोडून घेण्याचा प्रयत्न करा. भविष्यात इतरांशी जोडून घेणाऱ्यांना विशेष स्थान असेल,'' असे मत भारतातील फ्रान्सच्या दूतावासातील (शिक्षण, विज्ञान आणि संस्कृती) सल्लागार डॉ. बैरत्रॉं द हार्टिंग यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 115व्या पदवीप्रदान सोहळ्यात डॉ. हार्टिंग प्रमुख पाहुणे होते. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

डॉ. हार्टिंग म्हणाले, 'जगापुढे मोठी आव्हाने उभी आहेत. त्यात हवामान बदल, तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे झपाट्याने बदलणारे जीवन आणि दहशतवाद यांचा समावेश आहे. जग खूपच संकुचित होत चालले आहे. अशा परिस्थितीत भारतात बहुविविधता समजून घेण्याची आणि त्यात जगण्याची क्षमता आहे. बहुविविधता समजून घेत जगण्याचे कौशल्यही भारतीयांमध्ये आहे.''

डॉ. करमळकर यांनी विद्यापीठाच्या वाटचालीचा आढावा घेतला. नवीन अभ्यासक्रमांची माहिती दिली. या सोहळ्यात जवळपास सहा हजार 212 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे देण्यात आली. त्यात 127 पीएच. डी. धारकांचाही समावेश आहे.

सुवर्णपदकाचे मानकरी - वसुंधरा कुचंकर, नीलेश पाटील, रेबेलो लिलीअन, राहुल चांदे, मोहन काशीद, मयुरिका चॅटर्जी (तंत्रज्ञान विभाग)

पदवी प्रमाणपत्रावर आता विद्यार्थ्याचे छायाचित्र - कुलगुरू
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुढील पदवीप्रदान समारंभात विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पदवी प्रमाणपत्रावर त्यांचे छायाचित्र असणार आहे. काही वर्षांपूर्वी तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात सांगितले होते. त्याप्रमाणे विद्यापीठ अंमलबजावणी करणार आहे,अशी घोषणा कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : नाशिकच्या गंगापूर रोडवरील ICICI बँकेत चोरी

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT