Farmer Sunita Bankar
Farmer Sunita Bankar Sakal
पुणे

Leopard Attack : शेतकरी महिलेवर बिबट्याचा हल्ला; बिबट्याशी दिली एकाकी झुंज, स्कार्फमुळे वाचला जीव

रवींद्र पाटे

नारायणगाव - वारुळवाडी (ता. जुन्नर ) ग्रामपंचायत हद्दीतील ठाकरवाडी शिवारात शेतात काम करत असलेल्या महिलेवर मंगळवारी (ता. 16) सायंकाळी बिबट्याने तीन वेळा हल्ला केला. महिलेने प्रसंगावधान राखून हातातील खोऱ्याने प्रतिकार केला. बिबट्याने महिलेची मान पकडण्याचा प्रयत्न केला.

मात्र डोक्याला स्कार्फ बांधलेला असल्यामुळे महिलेला जीवदान मिळाले. या भागात वाढलेल्या बिबट्यांच्या संख्येमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण असून बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा. बिबट्याची नसबंदी करावी. शेती सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा असावा. यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके यांनी पाठपुरावा करावा. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

दरम्यान घटनास्थळी जुन्नर वनविभागाच्या वतीने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आज सकाळी तातडीने पिंजरा लावण्यात आला आहे. घटनास्थळी वनपाल अनिता होले, वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांनी भेट दिली.

याबाबत माहिती अशी, ठाकरवाडी शिवारातील बनकर -मेहेर मळा शिवारात मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सुनिता महेश बनकर(वय 45) या घास पिकाला पाणी भरत होत्या. दरम्यान त्या बारे देण्यासाठी खाली वाकल्या असता उसाच्या शेतातून आलेल्या बिबट्याने सुनिता बनकर यांच्यावर झडप घातली. त्यांनी हातातील खोऱ्याने बिबट्याचा प्रतिकार केला.

त्यानंतर बिबट्याने दोन वेळा त्यांच्यावर हल्ला करून त्यांची मान पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र सुनीता बनकर यांच्या डोक्याला मानेपर्यंत स्कार्फ गुंडाळला असल्याने त्यांना जीवदान मिळाले. अंगावर शहारे आणणाऱ्या या प्रसंगात महिलेने बिबट्याशी एकाकी झुंज दिली.

या परिस्थितीमध्ये खोऱ्याचा घाव वर्मी लागल्याने व आरडाओरडा केल्याने बिबट्या उसाच्या शेतात निघून गेला. सुनिता बनकर या रणरागिनीच्या धाडसाचे शेतकरी वर्गातून कौतुक होत असताना शासन व वन विभागाचे बिबट्या बाबतचे बोटचेपे धोरण याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सुनीता बनकर (धाडसी शेतकरी महिला) -

या भागात मागील तीन महिन्यापासून पिलांसह बिबट्याचा वावर आहे. दिवसा शेतात बिबटे व पिल्ले खेळताना दिसतात. आठ दिवसांपूर्वी लसुन खुरपत असताना माझ्यासमोर बिबट्या येऊन बसला होता. यापूर्वीही एकदा बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. बिबट्याचा प्रतिकार कसा करायचा याचे प्रशिक्षण मी घेतल्यामुळे माझा जीव वाचला. फटाके वाजवून सुद्धा आता बिबटे घाबरत नाहीत. पिंजरा लावण्याच्या पलीकडे वनविभागाचे अधिकारी कोणतीही ठोस कारवाई करत नाहीत. आमचा जीव गेल्यानंतर शासन लक्ष देणार आहे का. असा सवाल बनकर यांनी उपस्थित केला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात जीव गेल्यानंतर आम्हाला दिली जाणारी मदत नको. त्या ऐवजी आमचा जीव वाचण्यासाठी त्यांचा कायम कायमस्वरूपी बंदोबस्त करावा.

राजेंद्र मेहेर (सरपंच : ग्रामपंचायत वारूळवाडी) -

येथील गणपीर बाबा डोंगर, डिंभे डावा कालवा, मांजरवाडी, वळणवाडी, चिमणवाडी,वारूळवाडी, गुरुवर्य रा.प. सबनीस विद्यामंदिर या पाच किलोमीटरच्या पट्ट्यात 50 ते 60 बिबट्यांचे वास्तव्य आहे. या भागातील शेतकऱ्यांना रोज बिबट्याचे दर्शन होत आहे. अनेक पाळीव प्राणी बिबट्याने फस्त केले आहेत.केवळ पिंजरा लावणे हा एकमेव कार्यक्रम वनविभागाचा आहे. बिबट्या नियंत्रणासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही. शेतीसाठी रात्रीचा वीज पुरवठा दिला जात आहे. वाढत्या बिबट्यांच्या संख्येमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.बिबट्याचा तुम्हीच प्रतिकार करा असा सल्ला वनविभागाचे कर्मचारी देत आहेत.

ज्ञानेश्वर पवार( वनरक्षक) -

घटनास्थळी आज सकाळी पिंजरा लावण्यात आला आहे. वारूळवाडी परिसरात बिबट्यांची संख्या वाढली आहे. ही वस्तुस्थिती आहे. उपवनसंरक्षक अमोल सातपुते, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रोनद्वारे या भागातील बिबट्याची टेहाळणी करण्यात आली आहे. मात्र उसाचे क्षेत्र जास्त असल्याने बिबट्यांच्या हालचाली नोंदवण्यात यश आले नाही. मांजरवाडी, सबनीस विद्यामंदिर परिसरात यापूर्वी सहा बिबटे पकडण्यात आले आहेत. सद्यस्थितीत वारूळवाडी भागात दोन, कोल्हेमळा येथे एक असे तीन पिंजरे लावण्यात आले आहेत. शेतकऱ्यांचा फोन येताच आम्ही घटनास्थळी दाखल होत आहे. बिबट्याचा प्रतिकार कसा करावा यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT