Leopard
Leopard esakal
पुणे

Leopard : शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या आवारात बिबट्याची एन्ट्री; विद्यार्थी व प्राध्यापकांमध्ये घबराटीचे वातावरण

डी. के. वळसे पाटील

मंचर - अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथील शासकीय अभियांत्रिकी व तंत्र निकेतन महाविद्यालयाच्या आवारात व परिसरात दिवसा व रात्री बिबट्याचा फेरफटका सुरु झाला आहे. विद्यार्थ्यानी बिबट्याला मोबाईलमध्ये कैद केले आहे. त्यामुळे विद्यार्थी व परिसरात राहणाऱ्या कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मंचरच्या पूर्वेला दोन किलोमीटर अंतरावर मुधारा डोंगराच्या पायथ्याला दोन महाविद्यालये आहेत.येथे देशाच्या विविध भागातील मुले व मुली उच्च शिक्षण घेत आहेत. एकूण दोन हजार ९०० विद्यार्थी असून वसतिगृहामध्ये एक हजार ६०० मुले व मुली तसेच प्राध्यापक व कर्मचारी राहतात. पूर्वी रात्री फिरणारा बिबट्या आत्ता दिवसाही फिरत आहे.

या भागातील अनेक कुत्री बिबट्याने फस्त केली आहेत. अनेक विद्यार्थी व नागरिक फेरफटका मारण्यासाठी डोंगरावर जात होते.पण बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने डोंगरावर जाणे बंद केले आहे.

'ता. १२ डिसेंबर रोजी पहाटे अडीच वाजता कर्मचारी व वसतिगृहात बिबट्या आला. त्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला केला. ही घटना सध्या वारंवार घडत आहे. मंचर वनपरीक्षेत्र अधिकारी यांनी ताबडतोब पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे.' अशी मागणी शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वाय.व्ही चव्हाण यांनी पत्राद्वारे केली आहे.

'अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे पत्र प्राप्त झाले आहे. महाविद्यालयाच्या परिसरात वन कर्मचारी यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.रात्री कर्मचारी गस्त घालतील, पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कार्यवाही केली जाईल.विद्यार्थ्यांनी व परिसरातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी प्रवास करताना काळजी घ्यावी.'

- स्मिता राजहंस, वनपरिक्षेत्र अधिकारी मंचर (ता.आंबेगाव)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi Death: इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघातामागे षडयंत्र आहे का, नेमकं काय घडलं? इस्रायलच्या भूमिकेबाबत मोठा दावा!

Rohit Sharma : क्रिकेटपटूंची गोपनीयता जपा! ; मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मा आयपीएल ब्रॉडकास्टरवर भडकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

Kalyan News: देशाच्या विकासासाठी मतदार महायुतीच्याच बाजूने, विश्वनाथ भोईरांचे वक्तव्य

Akshay Kumar : अक्षयचा दिलदारपणा; जॉली एलएलबीचं शूटिंग पूर्ण होताच केली 500 मुलींना मदत

SCROLL FOR NEXT