मसूरच्या मावळ्यासह २३ जणांकडून ‘लिंगाणा’ सर
रणरागिणींचाही समावेश; कठीण मोहीम नियोजनबद्ध, सुरक्षित पूर्ण
मसूर, ता. १ : येथील अजित निकम यांच्या नेतृत्वाखाली काेल्हापूर येथील मुलुखगिरी ट्रेकिंग संघटनेने रायगड जिल्ह्यातील समुद्रसपाटीपासून सुमारे २९६९ फूट उंच असलेला व चढाईस कठीण श्रेणीतील लिंगाणा सुळका यशस्वी सर केला. २३ मावळे व रणरागिणींच्या समूहाने ही जोखमीची मोहीम पार पाडली. ती नियोजनबद्ध व सुरक्षित पद्धतीने राबविली.
मोहरी गावातून पहाटेच्या सुमारास ट्रेकची सुरुवात झाली. रायलिंग पठार ओलांडल्यानंतर उतरण्यास अत्यंत कठीण असलेली बोराट्याची नाळ उतरून सर्व ट्रेकर्स सुळक्याच्या पायथ्याशी पोहोचले. सुरक्षित आरोहणासाठी आवश्यक असलेले साहित्यात दोरखंड, हार्नेस, कारबिनर आदी उपलब्ध करून दिले होते. या साहित्याचा वापर करून संपूर्ण टीमने सुळक्यावर यशस्वी आरोहण केले.
मुलुखगिरीचे संतोष सूर्यवंशी, चेतन चव्हाण, विकास भोसले, अजित निकम (मसूर), शाहीर पाटील, तृप्ती भोसले, नेहा किल्लेदार यांनी लीडिंग टीमचे महत्त्वपूर्ण काम केले. अजित निकम यांनी या मोहिमेत आघाडीचे नेतृत्व केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने प्रत्येक टप्प्यावर सावधगिरी बाळगली. कोणत्याही अपघाताशिवाय मोहीम यशस्वी केली.
श्री. निकम हे येथील एक अनुभवी गिर्यारोहक आहेत. अनेक वर्षांपासून ते सह्याद्रीतील कठीण गड-किल्ले आणि सुळके सर करण्याच्या मोहिमा यशस्वीपणे करत आहेत. वजीर सुळका, लिंगाणा सुळका यांसारख्या अत्यंत जोखमीच्या ठिकाणांसह अनेक आव्हानात्मक ट्रेक त्यांनी पूर्ण केले आहेत. त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे स्थानिक तरुणांत ट्रेकिंग आणि गिर्यारोहणाची आवड वाढली आहे.
या यशस्वी मोहिमेनंतर टीमने पुढील गडकोट मोहिमा राबविण्याचा संकल्प केला आहे. मुलुखगिरी ट्रेकिंग संघटना आणि अजित निकम यांच्या टीममार्फत अशा मोहिमा नियमितपणे चालविण्यात येणार असून, अधिकाधिक तरुण-तरुणींना सह्याद्रीच्या सौंदर्याशी जोडण्याचे काम सुरू राहणार आहे.
.............
चौकट
............
तरुणांत केली ट्रेकिंगची आवड
येथील अजित निकम हे अनेक वर्षांपासून सह्याद्रीच्या कठीण गड-किल्ले आणि सुळक्यांच्या मोहिमा यशस्वीपणे पूर्ण करत आहेत. त्यामुळे मसूर व परिसरात सह्याद्रीचा धाडसी मावळा म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण आणि धाडसी कार्यामुळे मसूर व परिसरातील तरुणांमध्ये ट्रेकिंगची आवड निर्माण झाली आहे. भविष्यातही अशा गड-किल्ले आणि सुळक्यांच्या मोहिमा राबवून सह्याद्रीच्या परंपरेचा जागरूक प्रसार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
B02477
लिंगाणा सुळका सर केल्यावर अजित निकम व सहकारी.
...............................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.