Sharad Pawar
Sharad Pawar 
पुणे

LokSabha 2019 : नातवासाठी आजोबांची माघार; मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार 

सकाळवृत्तसेवा

पुणे : माढा लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी नसेल, असे स्पष्ट करतानाच लोकसभेची निवडणूकच लढणार नसल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पुण्यात जाहीर केले. त्याचवेळी मावळ लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांच्या उमेदवारीला त्यांनी "हिरवा कंदील' दाखविला. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेऊन संभाव्य उमेदवारांच्या नावांबाबत पवार यांनी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली. खासदार उदयनराजे भोसले, विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार गणपतराव देशमुख आदी उपस्थित होते. 

ते म्हणाले, "एका कुटंबातील किती व्यक्तींनी निवडणूक लढवायची? त्यामुळे मी लढणार नाही. मात्र, बारामतीतून सुप्रिया सुळे आणि मावळमधून पार्थ यांनी लढावे, अशी सूचना आहे. नव्या पिढीमध्ये निवडून येण्याची क्षमता आहे. त्यामुळे पार्थ यांना संधी देत आहोत. माढा मतदारसंघातील उमेदवार येत्या दोन दिवसांत ठरवू. अहमदनगरची जागा राष्ट्रवादीची आहे. तेथे दोन आमदार असून, चार मतदारसंघांत राष्ट्रवादीला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. त्यामुळे ही जागा कशी सोडायची? याआधी दिवंगत बाळासाहेब विखे-पाटील यांना आम्हीच पराभूत केले आहे.'' 

...ही बारामतीची परंपरा 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माझी भेट झाली; पण आघाडीत येण्याबाबतचे निमंत्रण त्यांना दिले नाही. राज ठाकरेंना बारामतीतून स्क्रिप्ट येते, या मुख्यमंत्र्यांच्या आरोपावर, ही बारामतीची परंपरा आहे, असे सांगत मोरापंत हे बारामतीचे होते, याकडे पवार यांनी लक्ष वेधत मुख्यमंत्र्यांचे आरोप फेटाळून लावले. 

दिल्लीतील बैठकीनंतर जागावाटप 
लोकसभा निवडणुकीबाबत दिल्लीतील कॉंग्रेसच्या बैठकीत जागा बदलण्याबाबत चर्चा होईल. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण एकत्र येऊन जागावाटप जाहीर करतील. यासंदर्भात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशीही चर्चा झाली आहे, असेही पवार यांनी सांगितले. 

कुटुंबीयांसोबत झालेल्या चर्चेनंतर मी लोकसभा निवडणूक न लढण्याचे ठरविले आहे. आतापर्यंत 14 निवडणुका लढल्या, त्यात अपयश पाहिलेले नाही. आत्ताचा निर्णय ही माघार नाही. 
-शरद पवार अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

Parineeti Chopra : पहिल्याच भेटीत परिणीती चोप्रा पडली होती राघवच्या प्रेमात

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

SCROLL FOR NEXT