शुभांकर लॉन्स, म्हात्रे पूल - ‘सेल्फी’ काढत आम्ही एक आहोत, असा संदेश देताना भाजपचे पदाधिकारी. धीरज घाटे, अनिल शिरोळे, मेधा कुलकर्णी, गिरीश बापट, योगेश गोगावले व इतर.
शुभांकर लॉन्स, म्हात्रे पूल - ‘सेल्फी’ काढत आम्ही एक आहोत, असा संदेश देताना भाजपचे पदाधिकारी. धीरज घाटे, अनिल शिरोळे, मेधा कुलकर्णी, गिरीश बापट, योगेश गोगावले व इतर. 
पुणे

Loksabha 2019 : ‘मैं भी चौकीदार’ला प्रतिसाद

सकाळवृत्तसेवा

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मैं भी चौकीदार’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्हिुडओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुंबई, दिल्ली, बंगळुरू, उडीसा, अरुणाचल प्रदेश, ग्वाल्हेर येथील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पुण्याचा यामध्ये सहभाग नसला, तरी भाजप कार्यकर्त्यांनी टीव्हीवर लाइव्ह कार्यक्रम पाहिला. म्हात्रे पूल येथील शुभांकर लॉन्समध्ये भाजपने या कार्यक्रमासाठी खास स्क्रिनची सोय केली होती. शहरातील पदाधिकारी, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

महायुतीचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, ‘‘चौकीदार म्हणजे हातात काठी घेऊन शिट्टी मारणारा नाही, तर महात्मा गांधी यांच्या कल्पनेतील देशाचा विश्‍वस्त आहे. सरकारने भरपूर कामे केली आहेत. विरोधकांवर टीका करण्यापेक्षा आम्ही केलेली कामे मतदारांपर्यंत पोचवणे हे आव्हान आहे. ’’ 

या वेळी लोकसभा प्रभारी योगेश सागर, शहराध्यक्ष योगेश गोगावले, अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, विजय काळे, मेधा कुलकर्णी, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, श्रीनाथ भिमाले, अशोक कांबळे, मुरली मोहोळ, उज्ज्वल केसकर, दीपक मिसाळ, प्रशांत बधे उपस्थित होते.

बापट, कुल उद्या अर्ज भरणार 
महायुतीचे पुण्यातील उमेदवार गिरीश बापट आणि बारामतीच्या उमेदवार कांचन कुल हे दोघे मंगळवारी (ता. २) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बापट यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी कसबा गणपती येथे सभा होणार असून नंतर नरपतगिरी चौकापर्यंत रॅली काढली जाणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; एरर 502 काय आहे?

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: शिवम दुबे गोलंदाजीला आला अन् चेन्नईला विकेटही मिळवून दिली; बेअरस्टोचं अर्धशतक हुकलं

SCROLL FOR NEXT