पुणे - आदिवासी कोळी समाजाच्या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांनी निवडणूक लढण्याचा निर्धार केला.
पुणे - आदिवासी कोळी समाजाच्या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांनी निवडणूक लढण्याचा निर्धार केला. 
पुणे

आदिवासी कोळी समाज निवडणूक रिंगणात

सकाळवृत्तसेवा

पुणे - तब्बल ६५ वर्षे संविधानिक हक्कांपासून वंचित ठेवणाऱ्या प्रस्थापित राजकारण्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी आणि आदिवासी कोळी व अनुसूचित जमातींचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ‘क्रांतिकारी जयहिंद सेना’ या पक्षाच्या माध्यमातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य आदिवासी कोळी समाज समन्वय समितीने मेळाव्यात केला.

महाराष्ट्र राज्य आदिवासी कोळी समाज समन्वय समितीचा मेळावा नुकताच झाला. या वेळी मुख्य समन्वयक शरदचंद्र जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. संविधानिक अधिकार असूनही आदिवासी कोळी ढोर, टोकरे कोळी, कोळी महादेव, डोंगर कोळी, कोळी मल्हार, ठाकूर, ठाकर, हलबा, माना, गोवारी, मन्नेवार, मन्नेरवालू, भिल, तडवी, पारधी इत्यादी ३० ते ३५ जमातींना आरक्षणाचे अधिकार व सवलती आजवर मिळाल्या नाहीत. त्याचबरोबर अनुसूचित जमातींकरिता राखीव असलेले लोकसभा व विधानसभा मतदारसंघ फिरते न ठेवता जमातींचे मोठे नुकसान केले आहे. आदिवासी लॉबीच्या षङ्‌यंत्राला महाराष्ट्र राज्य आदिवासी कोळी समाज समन्वय समितीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यासंदर्भात राज्य सरकारला नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.

बेकायदेशीरपणे कार्यरत असलेल्या अनुसूचित जमाती समित्या बरखास्त व्हाव्यात, यासाठी समन्वय समिती चार वर्षांपासून सतत आंदोलने करत आहे; मात्र कोणताही कार्यवाही झालेली नसल्याने मेळाव्यात संताप व्यक्त करण्यात आला.

सर्व अन्यायग्रस्त जाती-जमातींवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा तीव्र करण्याच्या हेतूने लोकसभेची निवडणूक ही संधी समजून आपले अस्तित्व सिद्ध करण्याचे आवाहन समन्वय समितीतर्फे करण्यात आले. लोकसभा व नंतर विधानसभा निवडणूक लढवणे हीच राज्यातील अन्यायग्रस्त जाती-जमातींची प्रमुख वाटचाल असल्याचे या बैठकीत ठरले. ‘क्रांतिकारी जयहिंद सेना’ या राष्ट्रीय पक्षासोबत जाऊन निवडणुकांची रणनिती निश्‍चित केली आहे. यासंबंधीची अधिकृत घोषणा मुंबईतील पत्रकार परिषदेत होणार असल्याची माहिती समन्वय समितीचे सचिव किसन ठोंबरे यांनी दिली आहे. या मेळाव्यात क्रांतिकारी जयहिंद सेनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी जगदीश सोनवणे यांची निवड करण्यात आली. समन्वय समितीचे मुख्य नियंत्रक श्रीराम अकोसकर यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT