Corona-Patient 
पुणे

राज्यातील ६५ रुग्णांना पाठवले घरी; दिवसभरात आढळले तब्बल...!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यात गेल्या चार दिवसांच्या तुलनेत कोरोनाचे नवे रुग्ण आणि मृतांचीही संख्या सोमवारी (ता.20) थोडीफार कमी झाली; तेव्हाच कोरोनामुक्त होऊन घरी गेलेल्यांची संख्या मात्र वाढली असून, दिवसभरात 65 जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडले आहे.

विविध शहरांत 433 नवे रुग्ण सापडले असून, त्यांचा एकूण आकडा 6 हजार 666 पर्यंत गेला आहे. तर राज्यात 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परिणामी, मृतांची एकूण संख्या 223 झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत एका दिवसात सर्वाधिक 65 रुग्ण बरे झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

मुंबईतील सात आणि मालेगावातील दोघांचा मृत्य झाला असून, त्यात सहा पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. मृतांमध्ये 40 पेक्षा कमी वयाचा एक रुग्ण आहे. मृतांना उच्चरक्तदाब, मधुमेह, अस्थमा, हदयरोग, मूत्रपिंडाचे आजार असल्याचेही पुढे आले आहे. राज्यभरातून आतापर्यंत तपासणीसाठी पाठविलेल्या 76 हजार 92 पैकी 71 हजार 611 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, त्यातील 4 हजार 666 जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कोरोनाबाधितांपैकी 572 जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

सध्या राज्यभरातील 21 लाख 85 हजार लोकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे. ज्या लोकांना ताप, थंडी, सर्दी, खोकला आहे; अशा सुमारे 93 हजार 655 जणांना घरीच विलग राहण्याच्या (होम क्वॉरंटाइन) सूचना केल्या आहेत. तर 6 हजार 879 जण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. 

सोमवारी दिवसभरातील नवे रुग्ण : 433

एकूण रुग्ण : 4 हजार 666 

मृत : 9 

एकूण मृत : 223

सोमवारी बरे झालेले रुग्ण : 65

बरे झालेले एकूण रुग्ण : 572

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Candidate: नवनीत राणा, छगन भुजबळ चर्चेत; पण राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा वेगळाच मास्टरस्ट्रोक! अखेर नाव जाहीर, कुणाला दिली संधी?

Raigad Traffic: पालीकरांना मोठा दिलासा! शहरात अवजड वाहतुकीला सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय..

World Yogasana Championships: भारताचे निर्विवाद वर्चस्व! तब्बल २२ सुवर्णपदकांसह यजमान संघाचे अव्वल स्थान कायम

Video: Shreyas Iyer ची भारताच्या टी२० संघाचा कर्णधार बनल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर; म्हणाला, 'ही भावना खूपच...'

अयोध्येतील राममंदिराच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची रक्कम गायब; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT