esakal | वडिलांच्या निधनानंतर योगी आदित्यनाथांचं आईला भावनिक पत्र!
sakal

बोलून बातमी शोधा

Yogi-Adityanath

उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री म्हणून २३ कोटी जनतेची जबाबदारी माझ्यावर आहे. कोरोनाला हरवणे ही सर्वात मोठी जबाबदारी मी पार पाडत आहे. त्यामुळे मी अंत्यविधीसाठी येऊ शकत नाही.

वडिलांच्या निधनानंतर योगी आदित्यनाथांचं आईला भावनिक पत्र!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सोमवारी (ता.२०) पितृशोक झाला. आदित्यनाथ यांचे वडील आनंद सिंह बिश्त यांनी दिल्लीमधील एम्स रुग्णालयात ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

- Coronavirus : अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या मुलींकडूनच लॉकडाऊनचे उल्लंघन

सध्या देशभरात लॉकडाऊनची परिस्थिती असल्याने योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या वडिलांचे अखेरचे दर्शन घेण्यास उपस्थित राहता येणार नसल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी वडिलांवर कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत अंत्यविधी करण्यात यावा, अशा सूचनाही कुटुंबीयांना दिल्या आहेत. 

Video : CoronaFighter : कमाॅन मम्मा घरात बसू नकाेस

कोरोना व्हायरससंदर्भात एक बैठक सुरू असताना त्यांना वडिलांचा मृत्यू झाल्याचे समजले. मात्र, त्यानंतरही त्यांनी बैठक सुरूच ठेवली. यावेळी काही अधिकाऱ्यांनी योगी यांच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारास जाण्याची तयारी केली. मात्र, भावनांपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देत त्यांनी कुटुंबियांना अंत्यविधी करण्याच्या सूचना केल्या. यासोबतच त्यांनी आईला एक भावनिक पत्रही लिहले आहे. 

- पालघर साधू हत्याकांड प्रकरण : CM उद्धव ठाकरे यांचं स्पष्टीकरण, दोन पोलिस अधिकारीही निलंबित...

या पत्रात योगी आदित्यनाथ यांनी लिहले आहे की, परमपूज्य वडिलांच्या अचानक जाण्याने मला दु:ख झाले आहे. त्यांनी मला जन्म दिला आणि प्रामाणिकपणा, निस्वार्थ वृत्ती आणि समर्पण भावनेने लोक कल्याणाचे कार्य करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची शिकवन दिली. त्यांचे अखेरचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा आहे. मात्र, देश कोरोना व्हायरस या महामारीविरोधात लढत आहे. उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री म्हणून २३ कोटी जनतेची जबाबदारी माझ्यावर आहे. कोरोनाला हरवणे ही सर्वात मोठी जबाबदारी मी पार पाडत आहे. त्यामुळे मी अंत्यविधीसाठी येऊ शकत नाही. 

- Coronavirus : पाक पंतप्रधान इम्रान खान यांना भारताचं जोरदार प्रत्युत्तर

आई आणि कुटुंबातील सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे की, लॉकडाऊनचे सर्व नियम पाळत कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत अंत्यविधी पार पाडावा. परमपूज्य वडिलांच्या आत्मास प्रणाम करत त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आणि लॉकडाऊननंतर परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर मी दर्शनासाठी घरी येईन. 

loading image