maratha reservation give us reservation of our rights otherwise government protest Manoj Jarange Patil
maratha reservation give us reservation of our rights otherwise government protest Manoj Jarange Patil Sakal
पुणे

Manoj Jarange Patil : आमच्या हक्काचा आरक्षण आम्हाला द्या अन्यथा सरकारला सुट्टी नाय - मनोज जरांगे पाटील

संतोष आटोळे

इंदापूर : मराठ्यांना आरक्षण द्यायचे म्हणले की समिती आयोग, कागदपत्रे पाहिजेत पण ओबीसीला आरक्षण मात्र एका शासन निर्णयाद्वारे दिल जाते. जीवन जगताना जितकी पाण्याची गरज आहे तितकीच आता आरक्षणाची गरज झाली आहे.ओबीसी आमच्या हक्काचं आरक्षण असून तुमचं तुम्ही घ्या आमचं आम्हाला द्या अन्यथा सरकारला सुट्टी नाय असा इशारा मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवार (ता.21) रोजी इंदापूर येथे मनोज जरांगे पाटील यांच्या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले आरक्षण नसल्याने गरीब मराठा समाजाच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला, 1 टक्का कमी असल्याने मराठा लेकराचं स्वप्न पूर्ण झाली नाहीत, आरक्षणासाठी ऊन वारा पाऊस बघायचं नाही लेकरांना न्याय दिल्याशिवाय माग हटायचं नाही असाही निर्धारही व्यक्त केला.

आरक्षणासाठी सरकारने आपल्याकडून वेळ घेतलाय आपण सरकारला दिला नाही.प्रथम चार दिवसांचा वेळ दिला होता तेवढ्यात कायदा पारित करता येत नाही म्हणून सरकारने एक महिन्याचा वेळ घेतला पुढे आणखी दहा दिवस मुदतवाढ घेतली ती मुदत 24 तारखेला संपत असून लेकरांच्या तोंडाला घास आला आहे बहुतेक शंका आहे सरकार आपलेच लोक आपल्यावर टीका करायला सोडत आहे पण 24 तारखेपर्यंत काही प्रतिक्रिया द्यायची नाही त्यानंतर आम्हीच आहोत असा इशाराही त्यांनी मराठा आरक्षण विरोधात बोलणाऱ्या नेत्यांना दिला.

अंतरवाली सराटी येथे शांततेत सुरू असलेले आंदोलन सरकारने चिरडवले.आया बहिणींना रक्तबंबाळ केलं, चार महिन्याचे लेकरू मांडीवर असलेल्या मातेला मारहाण केली मात्र आम्ही मागे हटणार नाही.आजही आंदोलन सुरू आहे तुमच्या छाताडावर बसून आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही.मराठ्यांनी अफगाणिस्तानापर्यंत विजयाचे झेंडे लावले आहेत.यामुळे आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटायचं नाही असेही आवाहन त्यानी समाज बांधवांना केले.

साहेबांना विचारून येतो,परत आलेच नाहीत

यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू असताना एक मंत्री आला होता त्यांच्या भागात मराठ्यांना ओबीसी आरक्षण आहे त्याबाबत मी विचारले तर त्यांनी सांगितले त्यांच्याकडे शेती आहे मग आम्ही काय समुद्रात होड्या चालवितो काय असा प्रश्न उपस्थित केला यावर साहेबांना विचारून येतो असे म्हणून गेला तो अजून आलाच नाही.

त्यानंतर मंत्र्यांच्या मातब्बरांचे शिष्टमंडळ आलं त्यांना मी विचारले वेगवेगळ्या जातीच्या पोटजाती असतात मग मराठ्यांची कुणबी पोट जात होऊ शकत नाही का ? असा प्रश्न विचारल्यावर साहेबांना विचारून येतो म्हणाले ते परत आलेच नाहीत असाही टोला त्यांनी सरकारमधील मंत्र्यांना लगावला.

आपलेच लोक आपल्या विरोधात..

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप करत आपलेच लोक आपल्या विरोधात सोडल्याचे सांगितले ग्रामीण भागातील ओबीसी, धनगर, मुस्लिम, दलित बांधव यांना प्रत्येकाला वाटते की गरीब मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे मात्र आपल्यातीलच काही लोक विरोधात सोडले आहेत मात्र त्यांना कोणीही प्रतिक्रिया न देण्याचे आवाहन करीत 24 तारखे नंतर पाहू असा गर्भित इशारा दिला.

आज पुढील आंदोलनाची दिशा कळवणार..

शांततेच्या मार्गाने सुरुवात असलेल्या आंदोलन सरकारला जेरीस आणले असून कोणीही आत्महत्या करायची नाही जर पोरच मरायला लागली तर आरक्षणाच करायचं काय असा प्रश्न उपस्थित करत शांततेच आंदोलन रोखण्याची शक्ती देशात कोणाकडेही नाही.

आपलं लपून-छपून काही नसतं थेट असत, रविवार (ता.22) रोजी आंदोलनाची पुढील दिशा जाहीर केली जाणारा असून सर्वांनी आंदोलन शांततेत करायचं, उग्र आंदोलनाला माझा पाठिंबा असणार नाही असेही जरांगे पाटील यांनी जाहिर केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT