MIT
MIT 
पुणे

'पर्सोना फेस्ट-2018'ला लॅमबॉर्गीनी ब्रँडचे मालक टेनिनो लॅमबॉर्गीनींची उपस्थिती

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर (पुणे) : भारत देशात सध्या युवकांची संख्या जास्त आहे. त्याचबरोबर भारतासारख्या विकसनशील आणि आर्थिक क्षेत्रात गतिशील असलेल्या देशामध्ये गुंतवणूक करून देशातील सर्वसामान्यांसाठी अलिशान गाड्यांची निर्मिती करणार असल्याचे मत इटलीतील प्रसिद्ध उद्योजक तथा लॅमबॉर्गीनी कार ब्रँडचे मालक टेनिनो लेमबॉर्गीनी यांनी लोणी काळभोर (ता. हवेली) येथे व्यक्त केले.

लोणी काळभोर येथील एमआटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नालॉजी विद्यापीठ आयोजित 'पर्सोना फेस्ट-२०१८'च्या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून टेनिनो लॅमबॉर्गीनी उपस्थित होती. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील मत मांडले. यावेळी 'एमआयटी'चे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, मिटकॉमच्या संचालिका सुनीता कराड, लॅमबॉर्गीनी कार ब्रँडचे उपाध्यक्ष फिरुशियो लेमबॉर्गीनी, प्रसिद्ध अभिनेत्री क्लेरिसा बर्ट, जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध लेखक ग्रेग. एस. रीड, पद्मश्री पुरस्कार विजेते संगीतकार हरीहरन, प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुनील राय आदी उपस्थित होते.

यावेळी टेनिनो लॅमबॉर्गीनी म्हणाले, "भारत देशाची आर्थिक वाटचाल लक्षात घेता गुंतवणुकीसाठी हा महत्वाचा देश आहे. त्यामुळे भविष्या येथे गुंतवणुक करण्याचा आमचा विचार आहे. सध्या देशामध्ये युवकांना भरपूर संधी आहेत. विकसनशील देशाच्या विकासात सहभागी होऊन येथील समाजाच्या विकासासाठी पुढाकार घेत त्यांना चांगली जीवनशैली देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. लहानपणी काहीतरी वेगळे करायचे म्हणून डिझाईनकडे वळलो. त्याचा एक जागतिक स्तरावरील बँड झाला. तरुणांनी भविष्यात आपल्या कल्पनांना मूर्त रुप देण्यासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आपले प्रगती करावी."

सर्वसामान्यांच्या स्वप्नांना सत्यात उतरविण्यासाठी सर्वांना परवडणाऱ्या किंमतीची कार निर्मिती करणार असल्याचे देखील टेनिनो लॅमबॉर्गीनी यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान टेनिनो लॅमबॉर्गीनी यांना लेजंड ऑफ डिझाईन तर प्रसिद्ध अभिनेत्री क्लेरिसा बर्ट व प्रसिद्ध संगीतकार आणि गीतकार हरीहसेलिब्रिटी ऑफ एमिनन्स पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Latest Marathi News Live Update : नसीम खान असणार काँग्रेसचे स्टार प्रचारक

SCROLL FOR NEXT