Ratangad
Ratangad 
पुणे

रतनगड-हरिश्चंद्रगडावर शिवसंकल्प युवक शिबिर संपन्न

रमेश मोरे

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व भंडारदरा जलाशय व कळसुबाई अभयारण्याच्या कुशित वसलेल्या रतनगड व हरिश्चंद्रगड या यादवकालिन वनदुर्गावर शिव विचार जागर अभियान व शिवशाही संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तिनदिवसीय ' शिवसंकल्प युवक शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराचे हे अकरावे वर्ष नृसिंह हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय सांगवीच्या आजी माजी विद्यार्थी संघाच्या नेतृत्वाखाली या शिबिराचे दर वर्षी  नियोजन करण्यात येते. या शिबिराचे महत्व व उपयुक्तता सांगतांना शिबिराचे आयोजक व मुख्य मार्गदर्शक प्रा. डॉ. गजानन महाराज वाव्हळ म्हणाले, की 'वर्तमानकाळ हा भारतीय संस्कृती करीता संक्रमणाचा बिकटकाळ आहे. जसा अकराव्या शतकामध्ये सुलतानी आक्रमणांपासून संस्कृतीपासीन आपला महाराष्ट्रधर्म वाचविण्या करीता संत ज्ञानेश्वर संत नामदेवांनी वारकरी संप्रादयाची मुहूर्तमेढ रोवली आणि भारतीय संस्कृतीच्या उत्थाना करीता एक भक्कम व्यासपीठ निर्माण केले. आज तिच परिस्थिती निर्माण झाली आहे.

आजची तरुणाई पाश्चात्य आणि भोगवादी संस्कृतीला बळी पडुन व्यसनाधिन होत आहे. देवादिवकांपेक्षा या पिढीला शिवप्रभु खुप जवळचे वाटतात. तेव्हा या अशा तरुणांच्या मनामध्ये शिवप्रभुंचे स्वच्छ निर्व्यसनी चरित्र व प्रेरक विचार जागवुन त्यांच्यातील सुप्त शक्तिला विधायक कार्याकडे वळवले पाहिजे आणि हे केवळ अशा शिबिरांच्या माध्यमातुन शक्य आहे. या शिबिरांमधुन विद्यार्थी एका गडावरून दुसऱ्या गडाकडे पदभ्रमण करत जातो. या प्रवासा दरम्यान होणारे श्रम व संस्कार त्याच्यातील सदविवेकबुध्दिला चालना देण्याचे काम करते. १७, १८, व १९ डिसेंबर दरम्यान या शिवसंल्प युवक शिबिराचे आयोजन रतनगड व हरिश्चंद्रगड या वनदुर्गावर करण्यात आले होते.यात दिडशे युवकांनी सहभाग घेतला .शिबिराच्या पहिल्या सत्राचा प्रारंभ रतनगडाच्या पायथ्याला असणाऱ्या बाराशे वर्षापुर्वीच्या यादवकालिन 'अमृत्तेश्वर ' मंदिरातुन झाला. यावेळी शिबीरार्थींना रतनगड व अमृतेश्वराची ऐतिहासीक माहिती सांगण्यात आली. ' भय इथले संपत नाही ' या  सदरा मधे ह.भ.प. मधुसुदन पाटिल महाराज यांनी युवकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ' भिती हा माणसाचा सर्वात मोठा शत्रु आहे. जो भितीवर विजय मिळवतो त्याचाच इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला जातो . आणी ते म्हणजे  छत्रपति शिवाजी महाराज ! म्हणुनच शिवरायांचे चरित्र युवकांनी आचरणात आणायला हवे.  दुसऱ्या दिवशीचा प्रारंभ रतनगडावरील सुर्योदयाला साक्षी ठेवून सुर्यनमस्काराने करण्यात आला .' शिवकालिन दुर्गरचना ' या विषयावर दुर्गमभाग शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष शिवव्याख्याते श्री. राहुल शिंदे यांनी मार्गदर्शन केले.ते म्हणाले ' शिवरायांचा स्थापत्य कलेतील चमत्कार म्हणजे त्यांची गोमुखी पध्दत्तीची दुर्ग द्वार रचना होय . ज्याला विश्वात तोड नाही '. नंतर शिबिरार्थींनी गड सलामी देवुन कात्राईची खिंड ओलांडत हरिश्चंद्रगडाकडे प्रस्थान केले . हा तो हरिश्चंद्रगड ज्याचा उल्लेख  साडेतीन हजार वर्षापुर्वीच्या मत्स्यपुराण व आग्निपुराणात सापडतो.  तिसऱ्या दिवसाचा प्रारंभं शिवपरिपाठाने करण्यात आला . हरिश्चंद्रेश्वराच्या साक्षीने सर्व शिबिरार्थींना रायगडाची पवित्र माती देवुन शुध्द चारित्र्याची व व्यसनानपासुन दुर रहाण्याची शपथ देण्यात आली . या वेळी ऑयासिस कॉन्सीलरचे सर्वेसर्वा संमोहनतज्ञ डॉ. राजेंद्र मोरे यांनी मेडिटेशन द्वारे मुलांना आत्मसंकल्प करण्याकरीता प्रेरीत केले . शिवशाही संघटनेचे संस्थापक आध्यक्ष श्री. अमित थोपटे यांनी प्रस्ताविक केले. समारोप समारंभाचे सुत्रसंचलन युवा शिवव्याख्याते रुषीकेश शेलार यांनी तर आभार मुकेश चव्हाण यांनी मानले . किशोर घोडके, सुनिल कोटकर ,सुमित कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता पंकज शेलार, किशोर एकबोटे, विश्वजित पाटील, गणेश आडागळे, माधव मोरे, अमोल टेंभरे, वैष्णव शेळके, वैभव जुनवणे यांनी परीश्रम घेतले .फोटो ओळ- जुनी सांगवी येथील शिवविचार जागर अभियान व नरसिंह हायस्कुलच्या आजी माजी विद्यार्थी संघाच्या वतीने रतनगड व हरिश्चंद्र गडावर शिवसंकल्प अभियानात सहभागी युवक विद्यार्थी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT