पुणे

मिलिंद एकबोटे यांच्या पोलिस कोठडीसाठी आग्रही - विश्वास नांगरे पाटील

सकाळवृत्तसेवा

देहूरोड - कोरेगाव भीमा येथील घटनेप्रकरणी मिलिंद एकबोटे यांना केवळ अटक करून त्यांना जामीन मिळणे, हे तपास यंत्रणेला अपेक्षित नाही. सदर घटनेच्या तपासाच्या दृष्टीने त्यांच्या पोलिस कोठडीसाठी आम्ही आग्रही असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, देहूरोडचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणपतराव माडगूळकर, देहूरोडचे पोलिस निरीक्षक अरुण मोरे, हिंजवडीचे निरीक्षक अरुण वायकर, पौडचे सुरेश निंबाळकर पत्रकार परिषदेला उपस्थित होते. 

मिलिंद एकबोटे यांच्या अटकेचा मुद्दा आणि याप्रकरणी न्यायालयाने पोलिसांवर ओढलेले ताशेरे, याबाबत नांगरे पाटील म्हणाले,  एकबोटे यांना पोलिस कोठडीच मिळावी, अशी भूमिका न्यायालयात मांडली आहे. अटक झाली नसल्यामुळे एकबोटे यांना ऍडिशनल रिलीफ मिळाला. 

दाभोलकर, पानसरे हत्याप्रकरण 
नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्त्येस तीन वर्षे उलटली तरी, आरोपी मोकाटच आहेत. यावर नांगरे पाटील म्हणाले,  सीबीआय आणि एसआयटीकडून सुरू असलेल्या तपासासाठी पोलिसांकडून मदत केली जात आहे. याप्रकरणी कर्नाटक सीमेवरील पाच जिल्हे आणि आपल्या तीन जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक झाली आहे. त्यात मी स्वत: हजर होतो. सारंग अकोलकर आणि विनय बापूराव पवार यांच्यापर्यंत तपास पोचला आहे. सरकारने मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीसही जाहीर केले आहे. तपासाच्या दृष्टीने विशेष पथक कार्यरत आहे. तपासाची गती कमी केली नाही. सगळ्या बाजूने तांत्रिक बाबी तपासून धागेदोरे मिळविण्यासाठी गांभीर्याने काम सुरू आहे. 

टवाळखोर वठणीवर 
निर्भया महिला पोलिसांच्या पथकाने कोल्हापूर परिक्षेत्रातील ठाण्यांच्या हद्दीतील 22 हजारांहून अधिक टवाळखोरांना वठणीवर आणले. गुन्हे करणाऱ्यांना अद्दल घडविली जाईल, असे पाटील यांनी सांगितले. पोलिस ठाण्यांशी संबंधित समस्यांचे निरसन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT