temperature decrease in pune
temperature decrease in pune esakal
पुणे

Temperature : पुणे : किमान तापमानात घट होण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

गेल्या दोन दिवसांपासून असणाऱ्या काहीशा ढगाळ वातावरणामुळे राज्यातील किमान तापमानात चढ-उतार होत असल्याचे दिसून येते.

पुणे - गेल्या दोन दिवसांपासून असणाऱ्या काहीशा ढगाळ वातावरणामुळे राज्यातील किमान तापमानात चढ-उतार होत असल्याचे दिसून येते. पण तरीही हवेतील गारवा मात्र कायम आहे. सकाळच्या वेळी अनेक भागात धुक्याची चादर पसरल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत. दरम्यान, पुणे आणि परिसरासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात किमान तापमानात घट होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते. ढगाळ हवामानामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात अनेक ठिकाणी कमाल तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने घट झाल्याचे दिसून आले. शुक्रवारी मराठवाड्यातील उस्मानाबादमध्ये १०.३ अंश सेल्सिअस अशा सर्वाधिक नीच्चांकी तापमानाची नोंद झाली. तर पुण्यात १५.४ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविले गेले. येत्या दोन-तीन दिवसांत आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असून किमान तापमानातही घट होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCERT Syllabus: शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये दंगलीबद्दल का शिकवायचे? ; 'बाबरी मशीद'चे नाव हटवल्यानंतर NCERT संचालकांचा सवाल

MHT CET 2024 Results: एमएचटी सीईटी निकाल जाहीर, थेट लिंकवरून असा पाहा निकाल

Latest Marathi News Live Update : आण्णासाहेब पाटील महामंडळातील 61 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं

" 'Maharashtra 104'चा धुमाकूळ," वाचा नेमकी काय आहे भानगड

Smriti Mandhana: स्मृतीचं द. आफ्रिकेविरुद्ध खणखणीत शतक! 'हा' पराक्रम करणारी दुसरीच भारतीय महिला क्रिकेटर

SCROLL FOR NEXT