पुणे

आमदारांची तत्परता : वाहून गेलेला रस्ता करण्यासाठी लगेच पाठविले जेसीबी

दत्ता जाधव

माळशिरस : रस्ता वाहून गेल्याने ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात आल्याने आमदारांनी लगेच रस्ता दुरूस्त करून देण्यासाठी जेसीबी पाठविले. यामुळे परिसरातून आमदारांचे कौतुक होत आहे.

वाघापूर येथे चार दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटीमुळे येथील कड वस्तीला गावाला जोडणारा रस्ता ओढ्याच्या ठिकाणी पूर्ण वाहून गेला होता. यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. आमदार संजय जगताप यांनी परवा प्रत्यक्ष पाहिल्यानंतर काल त्वरित त्यांनी या ठिकाणी पाईप व जेसीबी पाठवून रस्त्याचे काम सुरू केले. यामुळे येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

वाघापूर, राजेवाडी परिसरात रविवारी चारच्या सुमारास ढगफुटी होऊन जोरात पाऊस झाला. यामुळे येथील शेतांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक नाले बंधारे फुटल्याने वाघापूर गावाच्या उत्तरेला असणारया ओढ्याला मोठा पूर आल्याने गावाला लागून असणारया कड वस्तीला जोडणारा ओढ्यावरील सर्व रस्ता वाहून गेला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली होती. आमदार जगताप यांनी सोमवारी याची प्रत्यक्ष पाहिल्यानंतर नागरिकांना तातडीने रस्ता वाहतुकीचे योग्य करून नागरिकांची गैरसोय दूर करू असें आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी काल तातडीने या ठिकाणी ओढ्यावरील पाणी जाण्यासाठी मोठे पाईप टाकून स्वत जेसीबी पाठवून रस्त्याचे काम सुरू केले. आमदारांच्या या तत्परतेने नागरिकांची गैरसोय दूर झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. 

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

SCROLL FOR NEXT