mns activist join ncp lok sabha election ajit pawar group politics
mns activist join ncp lok sabha election ajit pawar group politics Sakal
पुणे

मनसे कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी मध्ये प्रवेश; लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाची तालुक्यात ताकत वाढणार

मनोज कुंभार-वेल्हे

वेल्हे,(पुणे ) : राजगड तालुक्यातील शेकडो मनसे कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याने राजगड तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकत वाढणार असून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोठी मदत होणार आहे.

राजगड तालुक्यात मनसेची ताकद गेल्या काही वर्षामध्ये वाढल्याचे चित्र दिसत होते तर मनसेचे २०१७ सालचे वेल्हे मार्गासनी गटाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार गोपाळ इंगुळकर यांचा अवघ्या काही मताने निसटता पराभव झाला होता. तर येणार्‍या जिल्हा परिषद निवडणुकी मध्ये मनसेचे प्रबळ दावेदार असलेले इंगुळकर यांनी प्रवेश केल्याने तालुका मनसेला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान पाडव्याच्या दिवशी मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा न लढविण्याच्या निर्णयाने तालुक्यातील अनेक मनसे कार्यकर्ते नाराज झाल्याने हा प्रवेश केल्याची चर्चा आहे.

मार्गासनी ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गोपाळ इंगुळकर व कार्यकर्त्यांनी यांनी शनिवार (ता.१३) रोजी पुणे येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केल्याने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना मोठा फायदा होणार असल्याचे चित्र तयार झाले असून या प्रवेशा मध्ये तालुक्याचे जेष्ठ नेते व जिल्हा बँकेचे संचालक रेवणनाथ दारवटकर यांचा मोठा वाटा असल्याचे समोर येत आहे.

यावेळी अजित पवार यांनी राजगड तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाही दिली असून तालुक्यातील महत्त्वाची कामे मार्गी लागणार असल्याचे गोपाळ इंगुळकर यांनी सांगितले असून भविष्यातील राजकारणासाठी व विकास कामांसाठी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे सांगितले.

यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर,जिल्हा बँक संचालक रेवणनाथ दारवटकर ,कात्रज दूध संघाचे चेअरमन भगवान पासलकर,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, माजी पंचायत समिती सदस्य गुलाब रसाळ, तालुका अध्यक्ष किरण राऊत, युवक अध्यक्ष संदीप खुटवड, लव्हीचे सरपंच शंकर रेणुसे, विकास नलावडे,मनोज जगताप ,राजू गिरंजे,बाबू गोरड,विठ्ठल धरपाळे,संतोष डांगे, दत्ता साळुंके, महेश साळुंके आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT