Corona_discharge 
पुणे

Pune Corona updates: तीन लाख पुणेकरांनी केली कोरोनावर मात!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यातील तीन लाखांहून अधिक रुग्णांनी आजअखेरपर्यंत कोरोनावर मात केली आहे. आजअखेर एकूण तीन लाख १ हजार  ११६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात बुधवारी (ता.२८) दिवसभरात ७३७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील २८८ जण आहेत. 

गेल्या २४ तासांत एकूण ६ हजार ४८८ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. बुधवारी १ हजार २०४ कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात पिंपरी चिंचवडमध्ये २०९, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १७०, नगरपालिका क्षेत्रात ५७ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात १३ नवे रुग्ण सापडले आहेत.

दिवसभरात मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १७ जण आहेत.
पिंपरी-चिंचवडमधील ४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ८ आणि नगरपालिका
क्षेत्रातील २ जणांचा मृत्यू झाला आहे. कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही मंगळवारी (ता.२७) रात्री ९ वाजल्यापासून बुधवारी (ता.२८) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

यामुळे पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ३ लाख २१ हजार ३९८ झाली आहे. यापैकी ३ लाख १ हजार ११६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १ लाख ५० हजार ३६० जण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील ८७ हजार २६०, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ५१ हजार ९१३, नगरपालिका क्षेत्रातील १५ हजार ३९३ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ५ हजार ६५८ जणांचा समावेश आहे. याशिवाय आतापर्यंत ७ हजार ७९८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील ३६५ जणांचा समावेश आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Legislative Council election : पुणे विधानपरिषद निवडणुकीत मोठी घडामोड; सुनील टिंगरे यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे

Revdanda Bridge : कोकणचा प्रवास होणार सुपरफास्ट! 1200 कोटींच्या रेवदंडा खाडीपुलाच्या कामाला वेग; वळसा घालून जाण्याचा फेरा वाचणार, कधीपर्यंत पूर्ण होणार प्रकल्प?

Early Symptoms of Brain Tumor: वारंवार तोल जाणे, विसरभोळेपणा किंवा अकारण पडणे; मेंदूतील ट्युमरची सुरुवातीची लक्षणे तर नाहीत ना? वाचा तज्ज्ञ काय सांगतात...

प्रसिद्ध निर्माते पहलाज निहलानी यांचं निधन; बॉलिवूड निर्माते आणि सेन्सॉर बोर्डामधील वादळी कारकिर्दीमुळे चर्चेत

inspirational Story: 'वय फक्त आकडा आहे!' ७५ व्या वर्षी हिंदी विषयात पीएच.डी.; सोलापूरच्या व्यंकटेश देवनपल्लींची प्रेरणादायी ज्ञानसाधना

SCROLL FOR NEXT