Solar-Power
Solar-Power 
पुणे

महापालिकेच्या इमारतींत सौरऊर्जेचा लखलखाट

ब्रिजमोहन पाटील

पुणे - दरवर्षी विजेच्या खर्चात भरमसाट वाढ होत असल्याने महापालिकेने सौरऊर्जा वापरण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. महापालिकेच्या ३९ इमारतींवर सौरऊर्जा पॅनेल बसविण्यात आले आहेत. त्यातून एका वर्षात १ हजार २५८ किलोवॉट वीजनिर्मिती होऊन महापालिकेची १ कोटी ७९ लाख ५१ हजार रुपयांची बचत झाली आहे. 

महापालिकेची विविध कार्यालये, नाट्यगृह, उद्याने, पाणीपुरवठा, मैलाशुद्धीकरण केंद्र, पथदिवे, दवाखाने, क्षेत्रीय कार्यालये अशा अनेक ठिकाणी वर्षाला २४० कोटी रुपये वीजबिलाचा खर्च येतो. त्यापैकी १८८ कोटी रुपयांचा खर्च हा पाणीपुरवठा आणि मैला शुद्धीकरण केंद्रांसाठी येतो तर इतर ठिकाणी ५२ कोटी रुपये खर्च येतो. विजेचा खर्च वाढत असल्याने महापालिकेने सौरऊर्जेचा वापर करण्याचा निर्णय घेतला. 

महापालिकेच्या विद्युत विभागाने पहिल्या टप्प्यात सौरऊर्जेचा वापर करण्यासाठी दोन पद्धतीने सोलर पॅनेल विविध इमारतींवर बसविले आहेत. ‘कॅपेक्‍स’ मॉडलमध्ये ३० इमारतींवर ८२५ किलोवॉट वीजनिर्मिती करणारे सोलर पॅनल बसवले आहेत. त्यासाठी ४ कोटी ९५ लाख रुपये खर्च आला.

‘रेक्‍सो’ मॉडलनुसार ९ ठिकाणी सोलर पॅनल बसवले आहेत. त्यातून ४३३ किलोवॉट वीजनिर्मिती होत आहे. ‘रेक्‍सो’ मॉडलमध्ये महापालिका संबंधित कंपनीला प्रतियुनिट ३.६२ रुपये देत आहे. ही कंपनी पुढील २५ वर्षे याची देखभाल करणार असल्याने त्यावर महापालिकेला काही खर्च करावा लागत नाही. ‘कॅपेक्‍स’ आणि ‘रेक्‍सो’ या दोन्ही मॉडेलमधून १ हजार २५८ किलोवॉट म्हणजेच १.२५८  मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे. यातून वर्षाला १ कोटी ७९ लाख ५१ हजार ५५६ रुपयांची बचत होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : पुण्यात मेट्रोच्या प्रवाशांमध्ये वाढ, एप्रिलमध्ये दिवसाला सरासरी 80 हजार जणांचा प्रवास

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT