नदीपात्र, डेक्कन - ‘आमची मुठा, आमची नर्मदा’ या मुठा पुनरुज्जीवन अभियानांतर्गत मंगळवारी पुणेकरांनी मुठा नदीची महाआरती केली.
नदीपात्र, डेक्कन - ‘आमची मुठा, आमची नर्मदा’ या मुठा पुनरुज्जीवन अभियानांतर्गत मंगळवारी पुणेकरांनी मुठा नदीची महाआरती केली. 
पुणे

‘नमामि देवी नर्मदे’च्या स्वरात मुठेची महाआरती (व्हिडिओ)

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘नमामि देवी नर्मदे’च्या मंगल स्वरांमध्ये प्रदूषित झालेल्या मुठा नदीत नर्मदेचे जल अर्पण करीत पुणेकरांनी मुठेची महाआरती केली. याप्रसंगी मुठा पुनरुज्जीवन अभियानाच्या निमित्ताने मुठा नदी स्वच्छ ठेवण्यासाठी हातभार लावणार असल्याची शपथ पुणेकरांनी घेतली.

नर्मदा जयंतीनिमित्त निनाद पुणे, महापालिका, कलातीर्थ, ग्रंथ पारायण दिंडीतर्फे ‘आमची मुठा, आमची नर्मदा’ अंतर्गत मुठा पुनरुज्जीवन अभियान कार्यक्रमाचे आयोजन डेक्कन येथील भिडे पुलाशेजारील नदीपात्रात करण्यात आले होते. या वेळी फुलगाव येथील स्वामी स्वरूपानंद सरस्वती, भालोद येथील प्रतापे महाराज, नर्मदा परिक्रमावासीयांची सेवा करणाऱ्या ज्योतीबेन पंड्या, हिरालाल रावत, निनादचे अध्यक्ष उदय जोशी, वीरेंद्र कुंटे, अमोल काळे, सुनील केसरी आदी उपस्थित होते.

स्वामी स्वरुपानंद सरस्वती म्हणाले, ‘‘आपण आपल्या घराची न सांगता स्वच्छता करतो, तशीच सेवा शहराची आणि मुठा नदीची करूयात.’’ 

नर्मदेच्या परिक्रमेतून मनुष्याच्या आतील राक्षस नष्ट होतो. सध्या माणसातील मनुष्य जिवंत होण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. नर्मदा ही फक्त नदी नाही, तर ती एक संस्कृती आहे. नर्मदेच्या परिक्रमामार्गावरील ग्रामस्थ नर्मदेची माता समजून सेवा करतात, असे पंड्या यांनी सांगितले.

या वेळी जोशी म्हणाले, की सध्या मुळा-मुठा नदी पूर्णपणे मृत, सत्वहिन व विषमय झाली आहे. तिला पूर्वीप्रमाणे स्वच्छ, निर्मळ करण्याचा मनोदय करीत नर्मदाजल मुळा-मुठा नदीत वाहते करून मुठा-पुनरुज्जीवन अभियान राबविण्यात आले. 

यानिमित्ताने नर्मदा आणि मुठा नदीच्या उगम स्थानावरील पाण्याची ‘जलकलश’ मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये रेणुका स्वरूप मेमोरिअल गर्ल्स हायस्कूल आणि पेरूगेट भावे हायस्कूल येथील मुलांनी मिरवणुकीत सहभाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : नाशिकच्या गंगापूर रोडवरील ICICI बँकेत चोरी

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT