sidbi
sidbi 
पुणे

देशव्यापी स्वावलंबन संकल्प मेळ्याचे उद्घाटन...

सकाळ वृत्तसेवा

पुणे: प्रशासक, बॅंक, नवउद्योजक एकत्र आले तर दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सने निश्चित केलेले लक्ष्य सहज साध्य होईल, असे मत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्यक्त केले. स्वावलंबन संकल्प मेळा अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

स्टॅण्डअप इंडिया स्कीम अंतर्गत, लघु उद्योग विकास बॅंक (एसआयडीबी- सिडबी) आणि राष्ट्रीय मागास जाती (एससी) आणि अनुसुचित जमाती (एसटी) तसेच महिला उद्योजकांना ग्रीनफिल्ड उपक्रम स्थापित करण्यास प्रोत्साहित करण्यााठी देशव्यापी स्वावलंबन संकल्प मेळ्याचे आयोजन केले आहे. सन २०१६ मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत बॅंकांमार्फत कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध असून, एससी आणि एसटी नव उद्योजक तसेच महिला उद्योजकांना १० लाख ते १ कोटी पर्यंत बॅंक कर्ज सुलभ पद्धतीने मिळू शकते. ग्रीन फिल्ड उपक्रम स्थापनेच्या उद्देशातच ही बाब नमूद करण्यात आली असून, २०२५ पर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्राच्या विकासासाठी आणि बळकटीकरणासाठी सिडबीने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. सिडबीच्या मिशन स्वावलंबन अंतर्गत युवा वर्गात उद्योजकता संस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने हा एकछत्री कार्यक्रम राबविला जात आहे. त्या कार्यक्रमाची सुरूवात पुण्यातून करण्यात आली. स्वावलंबन संकल्प, एसयुआय योजनेच्या प्रवेशास प्रोत्साहन देईल आणि इच्छुक एससी, एसटी उद्योजकांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने नोकरदार ते उद्योजक बनण्याचा प्रवास सुरू करण्याची संधी या मार्फत दिली गेली आहे, असे सिडबीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. मोहम्मद मुस्तफा यांनी सांगितले. एससी आणि एसटी उद्योजकांना उद्यम प्रवेशासाठी जास्तीत जास्त पोच, व्यवसाय माहिती आणि कर्जाच्या सुविधेसाठी संधी यामुळे लाभणार आहे, असेही ते म्हणाले.

स्टॅण्ड अप इंडिया अंतर्गत ३० कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, हा तिसरा कार्यक्रम आहे. १.२५ लाख एससी-एसटी उद्योजकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न या योजनेअंतर्गत केला जाणार आहे. २०१६ पासून सुरू झालेल्या या योजनेचा लाभ आतापर्यंत सुमारे २० हजार लाभार्थ्यांनी घेतला असून, येत्या पाच वर्षांत २.५ लाख उद्योजकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठीच महत्त्वाचे असलेल्या औद्योगिक क्षेत्र असलेल्या पुण्याची निवड करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT