ncp sharad pawar group melava at Otur of Junnar taluka on Monday politics
ncp sharad pawar group melava at Otur of Junnar taluka on Monday politics Sakal
पुणे

Pune News : राष्ट्रवादीत काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) जुन्नर तालुक्याचा ओतूर येथे सोमवारी मेळावा

पराग जगताप

ओतूर : जुन्नर येथे राष्टवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) जुन्नर तालुक्याचा मेळावा सोमवार ता.१३ रोजी होणार असून या मेळाव्यास शिरूर लोकसभेचे खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याची माहीती जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव चौगुले व तालुकाध्यक्ष तुषार थोरात यांनी दिली.

याबाबत मेळाव्याच्या नियोजनाची बैठक शनिवारी आळेफाटा (ता.जुन्नर) येथील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष (शरद पवार गट) अनंतराव चौगुले यांचे निवासस्थानी पार पडली. याप्रसंगी जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष शरद लेंडे,राष्ट्रवादी युवक कॉग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश सचिव ॲड.विजय कु-हाडे,

माजी पंचायत समिती सभापती अनिल घोलप,श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव वैभवे तांबे,अशोक सोनवणे,रोहीदास वेठेकर,तळशीराम भोईर,गोविंद साबळे,बबन काळभोर,जी.के.लांडे,जनार्दन खामकर,शांताराम वारे,अमोल म्हसणे हे व इतर राष्ट्रवादीत काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी चौगुले म्हणाले की तालुका राष्ट्रवादीत काँग्रेस पक्ष संघटना ही शरदचंद्रजी पवार यांचे विचाराने पुढे जात असताना सर्वांना विश्वासात घेवून सर्वसामन्यांना जनतेला कंद्रबिंदू मानून काम करणार आहे. सर्व समाजघटकांना एकत्र ठेवून पुढे जाण्याचा विचार महत्वाचा मानून काम करण्याचा संकल्प करण्यात आला.

तुषार थोरात म्हणाले की राज्यात राजकिय स्थिती काहीही असली तरी पवार साहेबांचा विचार जुन्नर तालुक्यातील जनतेनं स्विकारलेला आहे. तालुक्यातील जनभावना पवार साहेबां बरोबर जाण्याची असल्याचे दिसून येते.ओतूर येथील मेळावा नक्कीच कार्यकर्त्यांना बळ देणारा ठरणार आहे.तसेच या मेळाव्यात पक्षाच्या तालुक्यातील विविध सेल च्या पदाधिका-यांच्या निवडी करून निवडीचे पत्र ही देण्यात येणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: बंगालमध्ये वाद पेटला, TMC-ISF समर्थकांमध्ये हाणामारी, भाजपचा आरोप- पराभवाच्या भीतीने हिंसाचार

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT