पुणे

सुरक्षेसाठी हेल्मेट आवश्‍यकच - बापट

सकाळवृत्तसेवा

पुणे - हेल्मेट वापरणे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्‍यक आहे. पोलिसांनीही कायद्याची अंमलबजावणी करावी. मात्र, त्याचा अतिरेक होऊ नये, याची काळजी घ्यावी, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज येथे स्पष्ट केले. हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करीत हेल्मेट न वापरणाऱ्या पुणेकरांवर गेल्या काही दिवसांपासून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्र्यांनी प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केली.

गेल्या आठ दिवसांत पोलिसांनी हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाईची मोहीम उघडली आहे. एकीकडे हेल्मेटविरोधी कृती समितीचे आंदोलन जोरात सुरू आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस दंडात्मक कारवाई करीत आहेत. या विषयाबाबत प्रथमच भूमिका मांडताना बापट म्हणाले, ‘‘शहर व परिसरात होणाऱ्या अपघातांचा विचार केल्यास वैयक्तिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हेल्मेट वापरण्याची गरज आहे. मात्र, पोलिसांनी अगदी गल्लीबोळातील रस्त्यावरदेखील दुचाकीस्वारांवर कारवाई करणे  योग्य नाही.’’  हेल्मेटसक्‍तीच्या प्रश्‍नावर पालकमंत्री बापट यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी हेल्मेटविरोधी कृती समितीच्या वतीने करण्यात येत होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT