E-bus-pmp
E-bus-pmp 
पुणे

बसपाठोपाठ ३६९ कंडक्‍टर्स  पीएमपीमध्ये झाले रुजू 

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पीएमपीच्या ताफ्यात नव्या बस आल्यामुळे आता कंडक्‍टरही रुजू झाले आहेत. या ३६९ कंडक्‍टर्सच्या प्रशिक्षणाला सोमवारी सुरवात झाली. 

पीएमपीच्या ताफ्यात १०० ई-बस आणि सीएनजीवर धावणाऱ्या सुमारे ५० बस नुकत्याच दाखल झाल्या आहेत. नव्या बस आल्यामुळे पीएमपीमध्ये कंडक्‍टर्सची आवश्‍यकता भासत होती. पीएमपीने भरतीसाठी दोन वर्षांपासून प्रक्रिया सुरू केली होती. परंतु, लागोपाठच्या निवडणुकांतील आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया लांबली होती. नव्या बस येणार असल्यामुळे सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांनी भरतीची प्रक्रिया वेगाने पार पाडली. सुमारे १३०० उमेदवार भरतीसाठी पात्र ठरले होते. त्यांना कागदपत्रे छाननीसाठी बोलाविल्यावर ७०० उमेदवार आले. त्यातील ३६९ जणांची कंडक्‍टर म्हणून निवड झाली आहे. सोमवारी ते रुजू झाले. आता त्यांना १५ दिवसांचे प्रशिक्षण देणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्यांना मार्गावर धावणाऱ्या बसमध्ये नियुक्त केले जाईल. ई-बस आणि सीएनजीवर धावणाऱ्या बस भाडेतत्त्वावरील आहेत. त्यामुळे त्यांचे चालक संबंधित ठेकेदारांनी पुरवायचे आहेत. परिणामी, पीएमपीला कंडक्‍टर्सची आवश्‍यकता होती. दरम्यान, पीएमपीच्या ताफ्यात या पुढील काळात सीएनजीवर धावणाऱ्या आणखी ४०० बस येणार आहेत. त्यासाठीही कंडक्‍टर्सची भरती प्रक्रिया सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: काँग्रेसने 'कलम 370'ला आपल्या अवैध मुलाप्रमाणे सांभाळलं; अमित शाहांची बोचरी टीका

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT