पुणे

आता बदलाची वेळ - शरद पवार 

सकाळवृत्तसेवा

पुणे - ""कामगारांच्या प्रश्‍नांबाबत सरकारला काही देणे-घेणे नसेल, तर अशा सरकारशीही आपले काही देणे-घेणे नाही. हे आता घरोघर जाऊन सांगण्याची वेळ आली आहे,'' असा सल्ला देतानाच ""संघटित क्षेत्रातील कामगारांमध्ये सरकारबद्दल नैराश्‍याची भावना आहे. त्यांच्या तोंडी परिवर्तनाची भाषा आहे. त्यामुळे आता भूमिका घेऊन लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा वापर करून बदल करण्याची वेळ आली आहे,'' अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्ष भाजप सरकारच्या विरोधात उभे राहण्याचे आवाहन मंगळवारी केले. 

महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार अरुण जगताप, राज्य सहकारी साखर कारखानदार संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, रावसाहेब भोसले आदी उपस्थित होते. 

""साखर उद्योगाबद्दल राज्य आणि केंद्र सरकारने घेतलेल्या धोरणांवर टीका केली. साखर कामगारांचे वीस-वीस महिने वेतन होत नाही. सरकारही दाद देत नाही. कामगारांबाबत सरकारला काही देणे-घेणे नाही. त्यामुळे काही झाले, तरी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय साखर कामगारांनी घेतला आहे,'' असे काळे यांनी सांगितले. पवार यांनी तोच धागा पकडत साखर कामगारांना हे आवाहन केले. 

आजपर्यंत मी अनेक निवडणुका पाहिल्या, असे सांगून पवार म्हणाले, ""यांची निवडणूक जरा वेगळीच आहे. अनेक कामगार संघटना मला कार्यक्रमाला बोलावतात. गेल्यानंतर त्यांचे प्रश्‍न मांडतानाच परिवर्तनाची भाषा बोलतात. आजवर हे कुठे पाहायला मिळाले नव्हते. यावरून सरकारबद्दल कामगारांमध्ये नैराश्‍याची भावना आहे. त्यामुळे लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा वापर करून बदल करण्याची वेळ आता आली आहे.'' 

हर्षवर्धन पाटील म्हणाले, ""साखर कामगारांच्या वेतनाचा करार आणि सरकारची मुदत दोन्ही संपत आहे. त्यामुळे वेतन करार करून घ्यावयाचा असेल, तर दुसऱ्याची मुदत कमी केली पाहिजे. तरच कामगारांचे भले होणार आहे.'' या वेळी दांडेगावकर यांच्यासह अनेक मान्यवरांची भाषणे झाली. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT