Dr. Avinash Fatak and Madhuri Fatak esakal
पुणे

Pune News: भाडेकरू विरोधात उपोषणाला बसलेल्या पुण्यातील 'त्या' ज्येष्ठ दाम्पत्याला परत मिळालं स्वत:चं घर

Pune News: 'भाडेकरू, आम्हाला आमचं घर देता का घर?', अशी आर्त हाक देत पुण्यातील बिबेवाडी परिसरातील वृद्ध दाम्पत्य उपोषणाला बसले होते. एका भाडेकरुने त्यांच्या घरावर ताबा केला होता.

Sandip Kapde

Pune News:

बिबवेवाडी - 'भाडेकरू, आम्हाला आमचं घर देता का घर?', अशी आर्त हाक देत पुण्यातील बिबेवाडी परिसरातील वृद्ध दाम्पत्य उपोषणाला बसले होते. एका भाडेकरुने त्यांच्या घरावर ताबा केला होता. त्यामुळे वृद्ध दाम्पत्य आर्थिक विवंचनेत सापडले होते. बिबवेवाडीतील आपल्याच घरासमोर बसून त्यांनी  डॉ. अविनाश फाटक व माधुरी फाटक या वृद्ध दांपत्याने गांधी मार्गाने उपोषण केले होते. दरम्यान त्यांना यश मिळाले आहे.

डॉ. अविनाश फाटक ७३ वर्षांचे, तर माधुरी ६८ वर्षांच्या आहेत. त्यांच्या या आंदोलनाला अन्य ८-१० वृद्ध नागरिकांनी उपोषणाला बसून साथ दिली होती. मनसे नेते वसंत मोरे यांनी देखील  फाटक काका-काकूंना पाठिंबा दिला होता.

अखेर भाडेकरूने घरावरील ताबा सोडण्याची तयारी दर्शवली. डॉ. अविनाश फाटक व माधुरी फाटक यांना दीड महिन्यांनी घराचा ताबा मिळाला आहे. आज त्यांनी घरात सत्यनारायण पूजा केली. दोघेही आपल्या हक्काच्या घरात विसावलेत.

नेमकं काय घडलं होत?

फाटक दाम्पत्याचा सीताराम बिबवे पथावरील सदानंद सोसायटीत 'सरस्वती' नावाचा बंगला पाच वर्षांच्या भाडेकरारावर 'किडझी' हे नर्सरी स्कुल चालवण्यासाठी दिला होता. हा करार या वर्षाखेरीस संपणार आहे. सलग तीन महिने भाडे थकवल्यास जागा सोडावी लागेल, अशी तरतूद रजिस्टर अग्रीमेंट केलेल्या भाडेकरारात आहे. असे असतानाही गेल्या साडेतीन वर्षांपासून भाडेकरु भाडे देत नव्हते. या ठिकाणी पोटभाडेकरू ठेवून अन्य व्यवसाय अनधिकृतपणे करत होता. वारंवार फोन करण्याचा, भेटण्याचा प्रयत्न करूनही टाळाटाळ केली जात होती. यासंदर्भात फाटक दाम्पत्याने न्यायालयात देखील धाव घेतली होती. (Latest Pune News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT