Pragya Thakur: "PM मोदी म्हणाले होते मला माफ करणार नाही"; भोपाळमधून तिकीट नाकारल्यानंतर प्रज्ञा ठाकूर काय म्हणाल्या?

Pragya Thakur: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत अनेक विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्यात आली आहेत. भोपाळच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांचेही तिकीट कापले आहे.
Pragya Thakur
Pragya Thakuresakal

Pragya Thakur: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत अनेक विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्यात आली आहेत. भोपाळच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांचेही तिकीट कापले आहे. यावेळी त्यांच्या जागी आलोक शर्माला संधी देण्यात आली आहे. दरम्यान प्रज्ञा ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी कदाचित काही शब्द बोलले असतील जे मोदींना आवडले नसतील, असे प्रज्ञा ठाकूर म्हणाले.

भाजपने शनिवारी 195 उमेदवारांची यादी जाहीर केली. यावेळी आलोक शर्मा यांना भोपाळमधून तिकीट देण्यात आले आहे. पक्षाने मध्य प्रदेशातील 29 पैकी 24 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. भोपाळमधील प्रज्ञा ठाकूर आणि गुना येथील केपी शर्मा या राज्यातील दोन विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्यात आले असून त्यांच्या जागी ज्योतिरादित्य सिंधिया निवडणूक लढवणार आहेत.

'मोदीजींना माझे काही शब्द आवडले नाहीत'

"मी कदाचित काही शब्द वापरले असतील जे मोदीजींना आवडले नाहीत आणि ते म्हणाले होते की ते मला माफ करणार नाहीत, परंतु मी त्याबद्दल आधीच माफी मागितली आहे. माझे खरे बोलण्यावर माझे विरोधक आणि काँग्रेसचे लोक चिडतात आणि ते माझ्या आडून मोदींवर हल्ला करतात," असे प्रज्ञा ठाकूर इंडिया टुडे सोबत बोलताना म्हणाल्या.

Pragya Thakur
Uddhav Thackeray: आता ही लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी ; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला, मोदींवर थेट हल्लाबोल

प्रज्ञा ठाकूर यांनी महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला 'खरा देशभक्त' असे वर्णन केले होते, ज्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की ते त्याला माफ करू शकणार नाहीत. गोडसेच्या वक्तव्याबद्दल त्यांनी माफी मागितली आहे, पण महात्मा गांधींचा अपमान केल्याबद्दल प्रज्ञा ठाकूर यांना मी कधीही माफ करू शकणार नाही, असे ते म्हणाले होते.

मला तिकीट न देणे हा संघटनेचा निर्णय आहे, तिकीट का कापले, कसे कापले याचा विचार मी करत नाही. मी आधी तिकीट मागितले नव्हते आणि आताही मागितले नाही, असे देखील प्रज्ञा ठाकूर यांनी स्पष्ट केले. 

Pragya Thakur
Raj Thackeray Pune: राज ठाकरे पुण्यात बैठक न घेता संतापून का निघून गेले? पडद्यामागे नेमकं काय घडलं? सविस्तर वाचा...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com