One accused arrested in a house robbery case in Kondhwa 
पुणे

कोंढव्यात पावणे १० लाख रुपयांच्या घरफोडी प्रकरणी एकास अटक; ३० तोळे सोने जप्त

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोंढवा येथे डिसेंबर महिन्यात झालेल्या पावणे दहा लाख रुपयांची घरफोडी प्रकरणातील एका आरोपीस कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या गुन्ह्यातील ३० तोळे सोने पोलिसांनी अक्कलकोट येथून जप्त केले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रवीण चंद्रकांत गायकवाड (सध्या रा. किरकट वाडी, मूळ रा.बलुर्गी, अफजलपुर, गुलबर्गा, कर्नाटक) व काशिनाथ चंद्रकांत गायकवाड (वय 28, वर्ष रा.बलुर्गी, अफजलपुर, गुलबर्गा, कर्नाटक) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.


Coronavirus : कोरोनासाठी पुण्यात स्वतंत्र रूग्णालय; सरकारचा प्रस्ताव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथील खडी मशीन चौकाजवळ राहणारे संदीप बधे हे त्यांच्या कुटुंबीयांसह २० डिसेंबर २०१९ या दिवशी घरी कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यानी त्यांचे घराचा दरवाजा उचकटून घरामध्ये प्रवेश करीत 32 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व 48 हजार रुपये रोख रक्कम असा अंदाजे नऊ लाख 76 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी बधे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

या प्रकरणाचा तपास करताना सीसीटीव्ही चित्रिकरण व इतर तांत्रिक माहिती घेतली. त्यावेळी फिर्यादी यांच्या वाहनावर चालक म्हणून काम करणाऱ्या प्रवीण गायकवाड व त्याचा भाऊ काशिनाथ गायकवाड याच्या मदतीने चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. पोलिसांनी आरोपीचा पूर्वीचा पत्ता शोधून पाहणी केली,, मात्र आरोपी तेथे सापडला नाही. त्याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आली होती.

खासदार, आमदारांच्या ॲम्ब्युलन्स ताब्यात घ्या ! 
दरम्यान, ६ एप्रिलला प्रवीण गायकवाड याचा भाऊ काशिनाथ गायकवाड यास गुलबर्गा ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याबाबतची माहिती त्यांनी पुणे पोलिसांना दिली त्यानुसार पुणे पोलिसांनी संबंधित आरोपीस गुलबर्गा येथे जाऊन ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडे तपास केल्यानंतर त्याने चोरी केल्याची कबुली दिली. तसेच या गुन्ह्यात चोरी केलेले तीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने अक्कलकोट येथील दुधनी येथून जप्त केले. तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर या ठिकाणावरून काढून दिल्याने सदरचे दागिने सविस्तर पंचनामा करून जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

Corona Virus : कोरोनामुळे पुणे विद्यापीठ सील 
कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड,पोलिस निरीक्षक (गुन्हे) महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संतोष शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक इक्बाल शेख, पोलीस कर्मचारी योगेश कुंभार, पृथ्वीराज पांडुळे, कौस्तुभ जाधव,अजीम शेख,मोहन मिसाळ , उमाकांत स्वामी यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: एकाच पदासाठी वेगवेगळ्या परीक्षा नको, शुल्कही वाचणार! मंत्री शेलार यांची विधानसभेत माहिती

Mobile App to Predict Cancer Risk: कर्करोगाचा अंदाज आता मोबाईलवर! टाटा रुग्णालयातील संशोधकांची निर्मिती; जोखमीचे मूल्यांकन शक्य

Pune University flyover: पुण्यातील विद्यापीठ चौकाच्या उड्डाणपुलावरुन जाताना उडतोय गोंधळ; अर्धवट कामामुळे अपघाताचा धोका

उन्हाचा तडाखा वाढला! दिवसभरात प्या ४ लिटर पाणी, जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष, नागरिकांनी लहान मुलांची, ज्येष्ठांची कशी घ्यावी काळजी? वाचा...

Akola News : टी-२० विजयाच्या जल्लोषानंतर अकोल्यात तणाव; दोन गटात वादः वाहनांची तोडफोड, दगडफेकीत नुकसान

SCROLL FOR NEXT