Corona Virus : कोरोनामुळे पुणे विद्यापीठ सील 

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 11 April 2020

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहे. सर्वांनी घरात राहावे, बाहेर फिरू नका, असे आवाहन करण्यात येत आहे. मात्र विद्यापीठ आवारातील शेकडो कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय विद्यापीठबाहेर मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे जबाबदारीने वागणाऱ्या रहिवांशाचे आरोग्य धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे. बाहेर पडणाऱ्यांची अडवनूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे : 'कोरोना' विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यापीठाचा परिसर पूर्ण सील केला आहे. विद्यापीठ आवारात रहाणाऱ्यांना या परिसराच्या बाहेर जाण्यावर मर्यादा आणल्या आहेत.  शुक्रवारपासून (ता. १०) विद्यापीठाचे प्रवेशद्वार पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आले आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहे. सर्वांनी घरात राहावे, बाहेर फिरू नका, असे आवाहन करण्यात येत आहे. मात्र विद्यापीठ आवारातील शेकडो कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय विद्यापीठबाहेर मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे जबाबदारीने वागणाऱ्या रहिवांशाचे आरोग्य धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे. बाहेर पडणाऱ्यांची अडवनूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Coronavirus : कोरोनासाठी पुण्यात स्वतंत्र रूग्णालय; सरकारचा प्रस्ताव

विद्यापीठ परिसरात वास्तव्यास असणारे अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक व त्यांचे कुटुंबीय यांना जनरल जोशी प्रवेशद्वार व मुख्य प्रवेशद्वार  १०  एप्रिलपासून बंद करण्यात येत आहे. अत्यावश्‍यक कामासाठी या प्रवेशद्वारातून विद्यापीठबाहेर जायचे असल्यास संबंधितांना सुरक्षा विभागातून पास घेणे अनिवार्य आहे. एका कुटुंबासाठी आठवड्यातून फक्‍त दोन वेळा हा पास दिला जाईल. हा पास अत्यावश्‍यक कामासाठीच दिला जाईल. आयुका प्रवेशद्वार येथून प्रवेश दिला जाणार नसल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे, असे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी काढलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.

खासदार, आमदारांच्या ॲम्ब्युलन्स ताब्यात घ्या ! 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: University of Pune area is sealed due to Coronavirus