corona update.jpg
corona update.jpg 
पुणे

उरळगावच्या शिक्षकाचा कोरोना रिपोर्ट आला 'असा'

प्रताप भोईटे

न्हावरे (पुणे) : मुळचे उरळगाव (ता. शिरूर) येथील असलेले व सध्या शिरूर येथील प्रितम-प्रकाश नगर येथे वास्तव्यास असलेल्या एका ४१ वर्षीय शिक्षकाचा कोरोना तपासणी अहवाल आज (दि. १२) दुपारी पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती निमोणे  प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी इंदिरा डॅनियल यांनी दिली. संबंधित शिक्षकावर लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी या ४१ वर्षीय शिक्षकाला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याने एका खासगी डॉक्टरकडे उपचार घेतले. उपचारा दरम्यान त्या शिक्षकामध्ये कोरोनाची काही लक्षणे आढळून आली. त्यामुळे डॉक्टरने शिक्षकाला कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर शिक्षकाने पुणे येथील शासकीय रुग्णालयात स्वॅब तपासणीसाठी दिले होते. त्याचा तपासणी अहवाल आज (दि. १२) दुपारी पॉझिटिव्ह आला आहे.

कोरोना बाधित शिक्षकाने सध्या लाॅकडाऊनच्या सुट्टीच्या काळात लग्न समारंभ व दशक्रिया विधी याठिकाणीही हजेरी लावली आहे. अशी माहिती पुढे येत आहे. त्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे. सोमवारपासून (दि. १३) उरळगाव व परिसरात आरोग्य विभागाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : मुंबई, ठाणेसह कोकणात आज उष्णतेच्या लाटेचा 'हवामान'चा इशारा

SCROLL FOR NEXT