One person arrested in case of beef transportation Otur police crime
One person arrested in case of beef transportation Otur police crime Sakal
पुणे

Pune Crime News : ओतूर पोलीसांकडून गोमांस वाहतूक प्रकरणी एकाला अटक दाखल

पराग जगताप

Pune Crime News : ओतूर ता.जुन्नर येथील पोलीसांकडून गोमांस वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले असून एक गाडी ही गोमांसासह जप्त करण्यात आली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे यांनी दिली.

गोमांस वाहतूक प्रकरणी नासिर मोहम्मद शेख, वय ३८ रा. कोल्हेवाडी रोड,संगमनेर,ता. संगमनेर, जि.अहमदनगर असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याचे ताब्यातील मारुती सुपर कॅरी गाडी नंबर एम एच १२ क्यु डब्लू २८७१ ही गाडी अंदाजे किंमत ३ लाख ५० हजार व १५०० किलो जनावरांचे मास अंदाजे किंमत ३ लाख रूपये ताब्यात घेतले आहे.

या बाबत ओतूर पोलीसात ऋषिकेश मल्हारी शेलार, वय २५ रा. ओतूर, ता.जुन्नर यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत ठाणे अंमलदार बाळशीराम भवारी म्हणाले शनिवारी रात्री आठ वाजे दरम्यान नगर कल्याण महामार्गावर कोळवाडी येथे गोरक्षक तरूण व कोळवाडी ग्रामस्थ यांनी शंका आल्याने पांढर्या रंगाची मारुती सुपर कॅरी गाडी थांबली आणि गाडीच्या आत पहानी केली असता गाडीत भाजी पाल्याच्या पिशव्यांच्या मागे बेकायदेशिर रित्या कत्तल केलेल्या जनावरांचे मुंडके, अर्धवट तुटलेले पाय, व इतर मांस आढळून आले.

त्यानंतर नागरीकांनी पोलीसांना खबर दिली.ओतूर पोलीसांनी नासिर शेख व सदर गाडी आणी गाडीतील सर्व मांस ताब्यात घेतले असून पंचासमक्ष वैदयकिय विष्लेशणासाठी गोमांस सॅम्पल काढून घेवुन उर्वरीत बेकायदेशिर कत्तल केलेल्या जनावरांचे गोमांस विल्हेवाट लावण्या करता ओतूर ग्रामपंचायतचे कर्मचारी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढिल तपास सहायक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बी.ए.भवारी करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT