Migrants 
पुणे

ऑनलाईन अर्ज केल्यानंतर मिळणार घरी जाण्याचा 'पास'; नोडल अधिकारी तैनात!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जिल्ह्यातून अन्य राज्यात अथवा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामध्ये जाणारे मजूर, विद्यार्थी, यात्रेकरू आणि अन्य व्यक्ती यांनी covid19.mhpolice.in या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

पुणे पोलिस आयुक्त आणि पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त यांच्या हद्दीतील अर्जावर संबंधित आयुक्तालयातील नोडल अधिकारी तथा पोलिस उपायुक्त निर्णय घेतील, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

असा निर्णय घेताना मजूर, विद्यार्थी, यात्रेकरु व अन्य व्यक्ती यांची यादी पोलिस उपायुक्त, जिल्हाधिकारी यांच्यामार्फत ते ज्या जिल्हयात अथवा राज्यात जाणार आहेत तेथील जिल्हाधिकारी यांची परवानगी प्राप्त करुन घेतील. त्यानंतरच पास देण्यात येईल.
राज्य सरकारच्या निर्णयानुसार विस्थापित कामगार, यात्रेकरु, पर्यटक, विद्यार्थी  व इतर व्यक्ती यांचे प्रवासाकरीता आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार व्यक्तींची प्रवास व्यवस्था व त्याचे नियोजन करण्यात आली आहे. त्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील इतर जिल्ह्यात, राज्यांमध्ये जाणाऱ्या मजूर, विद्यार्थी, यात्रेकरु व अन्य व्यक्ती यांची यादी संबंधित तहसिलदार करतील. ते ज्या जिल्हयांमध्ये जाणार असतील तेथील जिल्हाधिकारी यांची परवानगी जिल्हाधिकारी, पुणे यांचेमार्फत घेतील. जोपर्यंत मजूर, विद्यार्थी, यात्रेकरु व अन्य व्यक्ती यांना ते ज्या जिल्ह्यात जाणार आहेत, तेथील जिल्हाधिकारी यांची परवानगी प्राप्त झाल्याशिवाय त्यांना पास दिला जाणार नाही.

कोरोना विषाणूचे कोणतेही लक्षणे नसल्याबाबतचे प्रमाणपत्र घेऊन लिंकवर अपलोड करणे अनिवार्य आहे. नागरिकांना लिंकवर माहिती भरण्यामध्ये काही अडचणी असतील तर त्यांनी ग्रामीण भागासाठी दूरध्वनी अथवा ई मेल द्वारे संपर्क साधावा.

याकरीता नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे (020-26111061 / 26123371) यांच्याकडे स्थलांतरीत कामगार (परराज्यात, जिल्ह्यात जाणारे), उपजिल्हाधिकारी श्रीमंत पाटोळे ( 020-26111061/26123371) यांच्याकडे स्थलांतरीत कामगार (परराज्यात, जिल्ह्यात येणारे), उपजिल्हाधिकारी नीता सावंत-शिंदे (020-26111061/26123371) यांच्याकडे विद्यार्थी, यात्रेकरु, पर्यटक (परराज्यात, जिल्ह्यात जाणारे), उपजिल्हाधिकारी स्वागत शाखा, अमृत नाटेकर (020-26111061/26123371) यांच्याकडे विद्यार्थी, यात्रेकरु, पर्यटक (परराज्यात/ जिल्ह्यात येणारे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कोर्टरूममध्ये अचानक गोंधळ; कपिल सिबल म्हणाले, “नाचण्याची वेळ झाली”, CJI सूर्यकांतही बोलले

Ola Uber Rapido new rules : ओला-उबर, रॅपिडो चालकांसाठी नवे नियम, १ सप्टेंबरपासून अंमलबजावणी; मराठी नाही आली की थेट कारवाई?

Indore Tourism: 14-D सिनेमा अन् 360 डिग्री व्हर्च्युअल जंगल सफारी; आता थरारक जंगल सफारीचा मिळणार प्रत्यक्ष अनुभव

Maharashtra Voter List: मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत मोठी माहिती समोर; ७५.५२ लाख मतदार सापडले नाहीत, १७ लाख नावे दुबार

Gold Mine Collapse : सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; ३० कामगारांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले

SCROLL FOR NEXT