esakal | Coronavirus : कोरोना झालाय म्हणून पसरवली अफवा अन् मग त्या दांपत्याला...
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus

महिलेने मध्यस्थी केली. तेव्हा साळुंकेने महिलेच्या डोक्यात दगड मारला, तसेच तिला ढकलून दिले.

Coronavirus : कोरोना झालाय म्हणून पसरवली अफवा अन् मग त्या दांपत्याला...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : सोसायटीतील एका रहिवाशाला कोरोनाचा संसर्ग झाल्याची अफवा पसरविल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या पती व पत्नीला एकाने जबर मारहाण केली. तर महिलेच्या डोक्यात दगड घालून महिलेस गंभीर जखमी केले. ही घटना हडपसर भागातील काळेपडळ येथे शुक्रवारी (ता.१) सकाळी साडे सात वाजता घडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संजय साळुंके (रा. काळेपडळ, हडपसर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी एका महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या काळेपडळ भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. तक्रारदार महिलेच्या पतीला रक्तदाब व मधुमेहाचा त्रास जाणवल्याने त्यांना वानवडीतील कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आरोपी साळुंकेने तक्रारदार महिलेच्या पतीला कोरोनाचा संसर्ग झाल्याची अफवा सोसायटीत पसरवली.

- 'मुझे मेरे गांव जाना है, लेकिन...'; परप्रांतीय कामगारांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उसळली गर्दी!

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता फिर्यादी महिला व त्यांचे पती साळुंकेच्या घराजवळ गेले. त्यांनी साळुंके यास अफवा का पसरवतो, अशी विचारणा केली. त्यावेळी साळुंकेने महिला व तिच्या पतीला शिवीगाळ केली. महिलेच्या पतीला दगड मारण्याचा प्रयत्न केला.

- तापमान वाढल्याने कोरोनाचा प्रसार होतो कमी? जगभरातील संशोधकांचं नक्की मत काय आहे, ते वाचा!

महिलेने मध्यस्थी केली. तेव्हा साळुंकेने महिलेच्या डोक्यात दगड मारला, तसेच तिला ढकलून दिले. या झटापटीत महिलेचे तीन तोळ्यांचे मंगळसूत्र तुटले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विक्रम पवार करत आहेत. 

- पुण्यात मशिदीवरील भोंग्यातून जागृती...

loading image