esakal | 'मुझे मेरे गांव जाना है, लेकिन...'; परप्रांतीय कामगारांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उसळली गर्दी!
sakal

बोलून बातमी शोधा

Pune_Collector_Office

अनेक कामगार अशिक्षित असल्यामुळे त्यांना ई-मेल द्वारे अर्ज भरता येत नाही.

'मुझे मेरे गांव जाना है, लेकिन...'; परप्रांतीय कामगारांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उसळली गर्दी!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : 'मुझे मेरे गांव जाना है, लेकिन साहब यह फॉर्म कैसे भरना है पता नहीं... जो नंबर दिया है वह फोन कोई नहीं उठा रहा है...अशा विवंचनेत शेकडो अशिक्षित मजूर आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रशासनाच्या क्लिष्ट आणि बदलत्या धोरणामुळे अडकून पडलेल्या कामगारांना घरी कसे आणि कधी परतणार, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे परराज्यांतील कामगारांनी शनिवारी तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गर्दी केली.

- नाकाबंदी होतीये आणखी कडक; कारण...

लॉकडाऊनमुळे शहरात अडकलेल्या परराज्यांतील कामगार आणि इतर व्यक्तींना त्यांच्या मूळ गावी स्थलांतर करण्यासाठी शुक्रवारी आणि आज शनिवारी शेकडो फोन आणि ई-मेल पुणे शहर तहसील कार्यालयाला प्राप्त झाले. हजारो कामगारांना घरी कसे जायचे, असा प्रश्न पडला आहे. त्यात तक्रार निवारण कक्षात दोनच फोन अशी परिस्थिती आहे. तक्रार निवारण कक्षातील फोन सतत बिझी लागत असल्यामुळे कामगारांना आणि इतर नागरिकांना स्वतःची माहिती देता आली नाही. 

- पुण्यात मशिदीवरील भोंग्यातून जागृती...

शहरात परराज्यांमधील बहुतांश कामगार हे ओडिशा, मणिपूर, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील आहेत. अनेक कामगार अशिक्षित असल्यामुळे त्यांना ई-मेल द्वारे अर्ज भरता येत नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या कंत्राटदार, बिल्डर यांनी त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन तहसील कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

- अभिमानास्पद ! बारामतीच्या सुपुत्राने राष्ट्रपती शौर्य पदका पाठोपाठ पटकाविले...

कामगारांकडून चार हजारांहून अधिक ई-मेल आल्यामुळे त्याची छाननी करणे अवघड होत आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी करून आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून त्यांना मूळ गावी पाठविण्यात येणार आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीतील कामगारांना पोलिस आयुक्त कार्यालयामार्फत परवानगी देण्यात येणार आहे.
- तृप्ती कोलते पाटील, तहसीलदार, पुणे शहर.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा