Crime_Murder
Crime_Murder 
पुणे

बहिणीशी प्रेमसंबंधाचा राग; पुण्यात 15 वर्षीय मुलावर कोयत्याने वार, आईलाही मारहाण

सकाळ वृत्तसेवा

विश्रांतवाडी (पुणे) : बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या रागातून भावाने आणि त्याच्या मित्रांनी तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. डोक्यात कोयत्याने सपासप वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मुलाला वाचविण्यासाठी आलेल्या त्याच्या आईलाही रॉडने मारहाण केली. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

राजू गौतम भिसे (वय 15, राज भैरवनगर, धानोरी) असे मारहाणीत गंभीर झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी तरुणाची आई सुनीता भिसे (वय 47) यांनी फिर्याद दिली आहे. प्रतीक ओव्हाळ (वय 23), सुनील ओहाळ (50), आशिष मोरे (22) आणि जीवन परियार (वय 24, रा. सर्व धानोरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक ओव्हाळ याच्या बहिणीशी जखमी राजू भिसे याचे प्रेमसंबंध होते. हा प्रकार तिच्या भावाला मान्य नव्हता. यामुळे अनेक दिवसांपासून तो राजूवर चिडून होता. यावरून गेल्या वर्षीही प्रतीक ओव्हाळ आणि त्याचा मित्र आशिष मोरे यांनी राजूला शिवीगाळ करून मारहाण केली होती.

यासंदर्भात विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय चांदखेडे म्हणाले की, तरुणाला कोयत्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असून चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT