
कोरोनामुळे आयुष्यात काय बदल झाले आहेत, याविषयी अब्दुल्ला बोलत होते.
जम्मू-काश्मीर : कोरोना व्हायरस महामारीमुळे देशभरातीलच नव्हे तर जगभरातील करोडो लोकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागला. आर्थिक, सामाजिक समस्यांव्यतिरिक्त अनेकांना वैयक्तिक गोष्टींना देखील मुकावे लागले. सामान्य नागरिकांपासून ते नेत्यांपर्यंत कोणीही यापासून सुटले नाही. याचाच प्रत्यय एका नेत्याच्या वक्तव्यामुळे आला.
कोरोनामुळे पत्नीला मिठी मारु शकत नाही. तसेच चुंबनही घेऊ शकत नाही, असं वक्तव्य जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे. त्यामुळे तेथे उपस्थितांमध्ये हशा पिकला होता. एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला अब्दुल्ला आले होते, त्यावेळी भर कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होऊ लागला आहे.
- Big Breaking: ममतादीदींनी गड बदलला; भाजपच्या बालेकिल्ल्यातून निवडणूक लढणार!
कोरोनामुळे आयुष्यात काय बदल झाले आहेत, याविषयी अब्दुल्ला बोलत होते. ते म्हणाले, ''मी माझ्या पत्नीचं चुंबन घेऊ शकत नाही. चुंबन तर लांब मनात इच्छा असून मिठी देखील मारता येत नाही. पुढे काय होईल याची कोणाला माहिती नाही. हे मी प्रामाणिकपणे सांगत आहे.''
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री अब्दुल्ला म्हणाले की, मी मास्क घातला नाही असे फोटो जेव्हा माझी मुलगी पाहते तेव्हा ती रागावते. जगभरात दररोज हजारो लोक मरत आहेत, त्यामुळे हात मिळवण्यास आणि मिठी मारण्यास भीती वाटते. कोरोनाची लस आता उपलब्ध झाली आहे, त्यामुळे परिस्थिती लवकर सुधारावी यासाठी मी प्रार्थना करत आहे, असंही अब्दुल्ला म्हणाले.
- Farmers Protest : 26 जानेवारीच्या ट्रॅक्टर परेडबाबत सुप्रीम कोर्टाची सुनावणी टळली
गुर्जर देश चॅरिटेबल ट्रस्टतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निवृत्त अतिरिक्त पोलिस महासंचालक मसूद अहमद चौधरी यांच्या चरित्र पुस्तकाचे प्रकाशन करण्यासाठी अब्दुल्ला आले होते. सामाजिक आणि शैक्षणिक प्रबोधन, पोलिस विभागातील योगदान, गुर्जर समुदायासाठी विशेष योगदान देणाऱ्या चौधरी यांना सर सय्यद म्हणून ओळखले जाते.
- सूटा-बूटाच्या मित्रांसाठी मोदींनी...राहुल गांधींचा धक्कादायक आरोप
Farooq Abdullah, has no kind of shiness The style of speaking reveals that as he is speaking in America and Trump Lala, was present on the ocassion. pic.twitter.com/eZ6yl1eG6w
— Zahid Parwaz Choudhary (@ZahidParwaz) January 17, 2021
- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)