padmakar dubhashi.jpg 
पुणे

डाॅ. पद्माकर दुभाषी यांचे निधन 

सकाळवृत्तसेवा

पुणे :   भारतीय विद्या भवन पुणे केंद्राचे अध्यक्ष, माजी केंद्रीय सचिव पद्मभूषण डॉ. पद्माकर रामचंद्र दुभाषी यांचे सोमवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, विवाहीत मुलगा, कन्या, सूना, नातवंडे असा परिवार आहे.

दुभाषी यांची प्रकृती शनिवार (ता. २९ ) पर्यंत उत्तम होती. गेल्या आठवड्यात त्यांनी भारतीय विद्या भवनचे कामकाज पाहून महत्त्वाच्या निर्णयांवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. मात्र, शनिवारी दुपारी अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने प्रयाग हाॅस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. दुभाषी यांचा मुलगा परदेशात असून, मुलगी पुण्यात आहेत. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर सोमवारी दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले, असे निकटवर्तीयांनी सांगितले. 

डॉ. दुभाषी यांनी १९५३ मध्ये प्रशासकीय सेवेत काम सुरू केले. त्यांच्या ४० वर्षाच्या कारकिर्दीत राज्य व केंद्र शासनात विविध पदांवर काम केले. गोवा विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरू होते. १९९० ते १९९५ या काळात त्यांनी विद्यापीठाचे कामकाज पाहिले. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी प्रशासन, राज्यशास्त्र, अर्थ आदी विषयांवर २७ पुस्तके लिहिली. त्यामध्ये ६ मराठी पुस्तकांचा समावेश आहे. 
प्रशासकीय सेवेबद्दल त्यांना २०१० मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. गेल्या १२ वर्षापासून ते भारतीय विद्या भवन पुणे केंद्राचे अध्यक्ष होते. संस्थेच्या जडणघडणीत त्यांचा महत्वाचा वाटा होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल; काही भागांत वादळी पाऊस, तर काही ठिकाणी उकाडा कायम

Rahul Gandhi: मतचोरीची किंमत चुकवावी लागेल; गोव्यातील सभेत राहुल गांधी यांचा घणाघात, सरकारवर काय केले आहेत आरोप?

Yavatmal News: २४ तासांत दोन शेतकरी पुत्रांची जीव संपवला ;यवतमाळ जिल्ह्यातील घटना; नापिकी व कर्जाला कंटाळून कवटाळले मृत्यूला

Maharashtra Drought Relief: दुष्काळी शेतकऱ्यांची दिवाळी पाच हजारांवर; २९० तालुक्यांचे पंचनामे रखडले, दोन हेक्टरची मदत डिसेंबरमध्ये!

Pune News: पुणे महापालिकेचा निष्काळजीपणा बेतला ज्येष्ठाच्या जिवावर; येरवड्यात रस्त्यावरील खड्ड्यात पडून मृत्यू

SCROLL FOR NEXT